🌟परभणीत धन्वंतरी जयंती निमित्त वैद्य अनंत विश्वासराव पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन......!


🌟शहरातील बि.रघुनाथ सभागृहात मिलेट्स तृणधान्य आजच्या काळातील सुयोग्य आहार या विषयावर होणार व्याख्यान🌟 

परभणी (दि.०२ नोव्हेंबर) : जागतिक आरोग्य संघटनेतर्फे 2023 हे  मिलेट्स वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. म्हणून यावर्षी आयुर्वेद व्यासपीठ तर्फे मिलेट्स तृणधान्य आजच्या काळातील सुयोग्य आहार या विषयावर वैद्य अनंत विश्वासराव पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

दि.०५ नोव्हेंबर,२०२३, रविवार सकाळी ११-०० वाजता बी. रघुनाथ सभागृह येथे हा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व परभणीतील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुर्वेद व्यासपीठाच्या अध्यक्षा डॉ. मंजुषा कान्हे, सचिव विनोद पत्की यांनी केले आहे. 

तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी यांच्यातर्फे मिलेट्सबद्दल माहिती देणारे तसेच प्रत्यक्ष मिलेट्स पाहायला मिळतील असे स्टॉल उभारण्यात येणार आहेत तरी सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा......

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या