🌟गंगाखेड तालुक्यातील मौजे.पिंप्री येथे सुरू असलेले ते आमरण उपोषण अखेर आज मागे....!🌟आ.डॉ.रत्नाकर यांच्या विनंतीला मान देऊन उपोषणार्थींनी घेतले उपोषण मागे🌟 


गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी सकारात्मक आश्वासन दिल्यामुळे गंगाखेड तालुक्यातील मौजे.पिंप्री येथे सुरू असलेले ते आमरण उपोषण अखेर आज मागे घेण्यात आले आहे. अनुसयादेवी मठ संस्थानाचे विद्यमान मठाधिपती सुरेंद्रगिरी महाराज यांनी गैरकारभार केल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यास भरघोस पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे सर्वत्र त्या उपोषणाची चर्चा सुरू होती. 


तब्बल ७०० वर्षांची परंपरा असलेल्या या आध्यात्मिक ठिकाणी असा प्रकार घडणे संयुक्तीक नाही. त्यामुळे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी तातडीने उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट दिली आणि उपोषणकर्त्यांचे म्हणणे समजून घेतले. तसेच सकारात्मक चर्चा करून उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यामुळे ग्रामस्थांनी माझ्या विनंतीला मान देऊन सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेतले आहे. म्हणून ग्रामस्थांचे आभार! उपोषणकर्त्यांनी केलेल्या आरोपाची शासनाने गंभीर दखल घेतली असून लवकरच योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल, असे विकासरत्न आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले.

यावेळी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, पोलीस उपअधीक्षक डॉ.दिलीप टिपरसे, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, उपोषणकर्ते अजय भिसे, वैभव कुरुडे, विजय भिसे, सिध्देश्वर भिसे, अच्युत भिसे, रघुनाथ भिसे, मोहन भिसे, कुंडलिक भिसे, बाळू भिसे, भारतराव भिसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या