🌟चिखलीत खाण्डल विप्र समाजातर्फे स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा यांना श्रद्धांजली.....!


🌟यावेळी त्यांच्या सामाजिक,राजकीय,आध्यत्मिक आठवणींना देखील उजाळा देण्यात आला🌟


चिखली : अकोल्याचे आमदार  गोवर्धन शर्मा यांचे  दिनाक तीन नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले होते . चिखली येथे खाण्डल विप्र समाजातर्फे चिखलीतील स्थानिक बालाजी मंदिर मध्य दिनांक पाच नोव्हेंबर रोजी  भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करण्यात आली व त्यांच्या सामाजिक,राजकीय,आध्यत्मिक आठवणींना उजाळा देण्यात आला. 

अकोल्याचे आमदार  माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचे तीन नोव्हेंबर रोजी निधन झाले होते. वयाच्या 74 व्या वर्षी गोवर्धन शर्मा यांनी अखेरचा श्वास घेतला. गोवर्धन शर्मा हे मागील अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. पण उपचारादम्यान शुक्रवारी तीन नोव्हेंबरला रात्री 8 वाजता त्यांचा मृत्यू झाला. मागील अनेक दिवसांपासून राहत्या घरीच त्यांच्यावर उपचार सुरु होते.

गोवर्धन शर्मा यांचा जन्म 2 जानेवारी 1949 रोजी यवतमाळमधील पुसद तालुक्यात झाला होता. त्यांनी अकोला येथील एलआरटी वाणिज्य महाविद्यालयातून बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले होते. 1985 ते 1995 पर्यंत अकोला नगरपालिकेत डाबकीरोड भागातून नगरसेवक म्हणून ते विजयी झाले होते. 1995 मध्ये पहिल्यांदा अकोला विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर त्यांचा विजय झाला होता. जून 1995 ते 7 मे 1998 या कालावधीत युती सरकारमध्ये मनोहर जोशी यांच्या मंत्रीमंडळात पशु, मत्स्य संवर्धन आणि दुग्धविकास खात्याचे ते राज्यमंत्री होते. अकोला आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते .

आमदार गोवर्धन शर्मा 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असं सलग सहा वेळा अकोल्यातून आमदार म्हणून निवडून आले होते. अकोला जिल्ह्यात व समाजात  'लालाजी' नावाने ते लोकप्रिय होते.  अतिशय साधं राहणीमान आणि लोकांना सहज उपलब्ध असलेला नेता अशी त्यांची ओळख होती. लोकांशी थेट जनसंपर्क असल्याने सलग सहावेळा ते निवडणुकीच्या रिंगणात विजयी झाले होते. दरम्यान त्यांनी कधीही चारचाकी किंवा फोनही वापरला नाही. त्यांच्या या राहणीमानाचं नेहमी विशेष कौतुक केले जात होते. 

                                                                                     चिखली येथे खाण्डल विप्र समाजातर्फे चिखलीतील स्थानिक बालाजी मंदिर मध्ये पाच नोव्हेंबरला स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करण्यात आली व त्यांच्या सामाजिक , राजकीय, आध्यत्मिक आठवणींना उजाळा देण्यात आला या वेळी खाण्डल विप्र समाजाचे अध्यक्ष  लक्ष्मीनारायण खंडेलवाल ,उपाध्यक्ष श्रीराम शर्मा, सचिव जगदीश खंडेलवाल , कैलाश पांडे,जमनलाल पांडे,  रविंद्र पांडे , मोहन खंडेलवाल, विजय काछवाल, श्रीरामजी शर्मा,  सुरेश पांडे,  शिवशंकर शर्मा,  संदीप शर्मा,  उमेश शर्मा,विलास पांडे,  कृष्णा पांडे,  विकास पांडे,  सुरज खंडेलवाल , उमेश खंडेलवाल,चंकी पांडे,यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते......

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या