🌟मनपा आयुक्तांकडे जसपाल सिंग लांगरी यांची तक्रार🌟
नांदेड/प्रतिनिधी - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत माहिती अधिकार कायद्याला केराची टोपी दाखवले जात असल्याने सदर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या जन माहिती अधिकारी व अपीलिय अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी जसपालसिंग लांगरी यांनी मनपा आयुक्त डोईफोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडे जसपालसिंग ज्ञानसिंग लांगरी यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये प्रथम अर्जाद्वारे महानगरपालिकेतील बांधकाम बाबत कमीत कमी क्षेत्रफळाची मर्यादा, 2008 गुरुतागदीनिमित्त गुरुद्वारा परिसरातील तोडलेल्या घरांच्या दुरुस्तीबाबत मनपाचे विनाबांधकाम परवाना दुरुस्तीच्या ठरावाची प्रत सहाय्यक आयुक्त नजरचना यांच्याकडे केली होती. परंतु संबंधित विभागाचे जनमाहिती अधिकारी यांनी माहिती देण्यात टाळाटाळ करून सदर अर्ज वजीराबाद क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 4 कडे वर्ग केला . परंतु क्षेत्रीय कार्याकडूनही माहिती न देता सदर माहिती आमच्या विभागाशी संबंधित नसल्याचे कळवून माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे त्रस्त होऊन लांगरी यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. डोईफोडे यांना लेखी निवेदनाद्वारे महानगरपालिकेमध्ये होत असलेल्या माहिती अधिकार 2005 अधिनियमाचे उल्लंघनची बाब निदर्शनास आणून दिली असून विभाग प्रमुख या नात्याने आयुक्तांनी संबंधित क्षेत्रीयकार्यालयाचे जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी यांना देखील दिल्या आहेत.....
0 टिप्पण्या