🌟श्री क्षेत्र पद्मावती-दस्तापुर ते श्री क्षेत्र पंढरपूर व आळंदी देवाची साठी कार्तिकी पायी वारी दिंडीचे उद्या रविवारी प्रस्थान...!


🌟श्री संत मारुती महाराज दस्तापुरकर यांनी सुरू केलेली परमपंरा आजही कायम🌟

पुर्णा तालुक्यातील श्री क्षेत्र पद्मावती - येथुन संत मारुती महाराज दस्तापुरकर यांच्या समाधी मंदिरापासून रविवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4-00 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे .पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज व श्री संत मोतीराम महाराज संत मारुती महाराज यांच्या जय घोषाने दिंडी.!ज्ञानोबा !तुकाराम!राम कृष्ण हरी चा गजर करीत मार्गस्थ होनार आहे व राञी चा मुक्काम श्री क्षेत्र दस्तापुर येथे राहणार व सायंकाळी 5 ते 7 या  वेळात गुरुवर्य ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे हरी किर्तन होईल नंतर भक्तांसाठी महाप्रसाद होइल.13.रोजी गंगाखेड येथे संत जनाबाई मंदिर येथे मुक्काम.14रोजी परळी वैजनाथ येथील जगमिञ नागा मंदिर येथे मुक्काम. अंबाजोगाई श्रीराम वडगाव.पानगाव.जामगाव रीधोरा. संत सावता माळी समाधी मंदिर अरण. मंगळवार दिनांक 21रोजी .श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचणार आहे.व श्री क्षेत्र पंढरपूर येथे दिंडीचा मुक्काम संत मारुती महाराज दस्तापुरकर संस्थान. जलाराम मंदिराच्या पाठीमागे सोलापूर रोड पंढरपूर येथे राहिल . कार्तिकी एकादशीला नगर प्रदक्षिणा होईल चंद्रभागेच्या वाळवंटात  मारुती महाराज दस्तापुरकर यांच्या समाधी चा जल अभिषेक होईल व सहा दिवस पंढरपूर येथे मुक्काम राहील.

 सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथून आळंदी कडे प्रस्थान ठेवणार आहे.पहिला मुक्काम (दस्त्तु पाटी) येथे राहिल .माळशिरस नातेपुते फलटण. तरडगाव.खंडोबाची जेजुरी. सासवड.येरवाडा पुणे. संत जगतगुरु तुकाराम महाराज वैकुंठ गमन मंदिर श्री क्षेत्र देहू. बुधवार दिनांक 6, डिसेंबर रोजी श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे पोहोचेल.व संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्याला आळंदी येथे  देविदास धर्मशाळा येथे सहा दिवस मुक्कामी  राहतील.

तरी पंचक्रोशीतील भाविक- भक्तांनी  हजारो च्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन गुरुवर्य ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या