🌟पुर्णेतील तमाम जनतेला दिपावली व नववर्षाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा......!

🌟दिपावली व नववर्ष माझ्या तमाम पुर्णेकरांना सुखसमृद्धी व भरभराटीचे जावों - राज नारायणकर


पुर्णेतील तमाम सर्वधर्मीय समाज बांधवांना दिपावली व नववर्ष सुखसमृद्धी आणि भरभराटीचे जावो भ्रष्ट बेईमानशाहीच्या कचाट्यात अडकलेली माझी शहरवासीय जनता मुक्त होऊन या शहराचा खऱ्या अर्थाने विकास होवो अशी प्रार्थना मी दिपावलीच्या शुभ मुहूर्तावर परमेश्वराच्या चरणी करतों अश्या शब्दात जंग-ए-अजित न्युज वेबवृत्त वाहिनीच्या माध्यमातून युवा नेते तथा धाडसी व्यक्तीमत्व म्हणून पुर्णेकरांना परिचित असलेले व मा.आ.सिताराम मामा घनदाट मित्र मंडळाची बुलंद तोफ राज नारायणकर यांनी तमाम पुर्णेकरांना दिपावली व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.


यावेळी बोलतांना ते म्हणाले की माझ्या तमाम पुर्णेकरांनी या दिपावलीच्या शुभ मुहूर्तावर परमेश्वराच्या साक्षीने दृढ निर्धार करावा की आता आगामी काळात होणाऱ्या निवडणूकांमध्ये भ्रष्ट बेईमानशाहीच्या कुठल्याही भुलथापांना किंवा अमिषाला बळी न पडता स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना मतदान करुन शहराला लागलेली ही किड एकदाची कायमची हद्दपार करायची आहे असेही राज नारायणकर म्हणाले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या