🌟नांदेड शहरातील प्रजावाणी कार्यालय ते पाळेकर पेट्रोलपंप या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न...!


🌟आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी दिला दैनिक प्रजातींचे संपादक शंतनू डोईफोडे यांना उद्घाटनाचा सन्मान🌟 

नांदेड : नांदेड येथील मागील अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या प्रजावाणी कार्यालय ते पाळेकर पेट्रोलपंप या रस्त्याच्या कामाला मुहूर्त लाभले असून अखेर आज रविवार दि.१९ नोव्हेंबर २०२३ रोजी नांदेडचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या विशेष निधीतून या कामाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी प्रजावाणी कार्यालय ते पाळेकर पेट्रोलपंप या रस्त्याच्या उद्घाटनाचा सन्मान पत्रकार तथा दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे यांना दिल्यामुळे त्यांच्या हस्ते हा शुभारंभ सोहळा पार पडला यावेळी अनेक मान्यवरांची आवर्जून उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या