🌟त्यानी समाजाची सेवा केली गुरुद्वारा बोर्डात काम करताना सचिव पदावर केलेल्या कामाची दखल सदैव घेतल्या जाईल🌟
शिख समाजाच्या तरुणाना प्रेरणादायक व्यक्तित्व असलेले रंजितसिंघ कामठेकर यांच्या निधनाने समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे,प्रत्येक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन नेतृत्व स्विकारण्याची त्यांची जिद्द होती,प्रत्येक पक्षात त्यांचा वावर होता,शेती,समाजकारण,राजकारण, शिक्षण यात ते सदैव सक्रिय असत, ग्रामपंचायत व गुरुद्वारा बोर्ड च्या कमात त्यानी बराच काळ घालवला
त्यामाध्यमातून त्यानी समाजाची सेवा केली गुरुद्वारा बोर्डात काम करताना सचिव पदावर केलेल्या कामाची दखल सदैव घेतल्या जाईल, नांदेड़ मधे वास्तव्यास असताना देखील त्यांचा कामठा गावाशी कधी संपर्क कमी झाला नाही,या वेळी उपसरपंच पदावर काम करताना त्यानी अनेक योजना त्यानी आणल्या,अनेक मित्रांना त्याचाच सहारा होता,मित्रांच्या वैयक्तिक कामात त्यांनी सदैव मदत केली वेळ प्रसंगी त्यानी अपले राजकीय वजन वापरून त्यानी अनेक मित्रांना संकटातून बाहेर काढले,अनेक मित्रांना अपल्या राजकीय संबंधाचा वापर करुन त्यानी सत्तेत आणले,प्रत्येक व्यक्ति सह जूळवुंन घेऊन पुढे जाण्यात त्यांचा हतखंडा होता,भोळा राजकारणी असे त्याना म्हटले तर वावगे ठरणार नाही.माझ्या सारख्या अनेकांना ते सदैव मार्गदर्शक होते,सर्वाना जोड़नारा दुवा आज निखळला आहे.जी किमया रंजितसिंग मधे होती ती सर्वात असूच शकत नाही..
अमरीकसिंघ वासरिकर, नांदेड़
0 टिप्पण्या