🌟परभणी जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन🌟
परभणी (दि.०२ नोव्हेंबर) - परभणी जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने परभणीत उद्या शुक्रवार दि.०३ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११-०० वाजता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागणीसाठी हिजडा सरकार आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हिजडा सरकार आंदोलना अंतर्गत परभणी शहरातील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ गेट (काळी कमान) ते परभणी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोकशाही मार्गाने रॅली काढण्यात येणार असून आंदोलन हक्काचे,आंदोलन रक्ताचे,आंदोलन माणुसकीचे,आंदोलन सामान्य मराठ्यांचे,हे आंदोलन मराठा आरक्षणासाठीचे असणार असल्यामुळे मराठा समाज बांधवांनी या आंदोलनात जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परभणी जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.....
0 टिप्पण्या