(मोफत आरोग्य शिबीराचे उदघाटन सुमनबाइ गंगाधरदादा पवार,पोलिस निरीक्षक प्रदिप काकडे ,डॉ.जयश्री यादव तृप्ती वरपुडकर व उपस्थित सर्व मान्यवर)
🌟जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ.जयश्री यादव यांचें प्रतिपादन🌟
पुर्णा (दि.१७ नोव्हेंबर) - मनुष्याने नेमून दिलेले काम व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास यशाचे शिखरे सर करता येतात नेहमी आपल्याच कामात मग्न रहावे असे आवाहन जिल्हा आरोग्यआधिकारी डॉ.जयश्री यादव यांनी केले .
माखणी (ता .पूर्णा) येथील हनुमान मंदिर परीसरात आर्युवेद व्यासपीठ परभणी द्वारा भाजीपाला ग्रूप व ओंकार गृह उद्योग माखणी यांच्या सयूक्त विद्यमाने कै . गंगाधरदादा पवार यांच्या व्दितीय पुण्यस्मरणा निमित्ताने मोफत आरोग्य शिबीर शुक्रवार (ता . १७) घेण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षा तृप्तीताइ वरपुडकर , मार्गदर्शक डॉ. दत्तात्रेय मगर , जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ.जयश्री यादव , पोलीस निरीक्षण प्रदीप काकडे , सुमनबाई पवार , विजय पवार , डॉ. विद्या भालेराव , डॉ. बरखा देशमुख (मुंबई), धाराजी भुसारे ,सरपंच गोविंद नाना आवगंड , पंडीत थोरात , प्रकाश हरकळ , पुरुषोत्तम पवार , रेमेश पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती .
आरोग्य शिबिरात २१० रुग्णाची तपासणी करण्यात आली . शिबिरासाठी डॉ. मंजुषा कान्हे,डॉ. संदिप चव्हाण , डॉ.अंजली निरस , डॉ. मुक्तेश्वर पारवे , डॉ.अश्विनी कवठेवार, डॉ. शिवानी आवरगंड अदीनी उपचार केले पुढे बोलतांना डॉ. मंजुषा कान्हे म्हणतात मानवाला जबाबदारी घडवते म्हणूनच तो चांगुलपणा सिध्द करण्यासाठी जिव्हाळा जोपासतो कर्म करतो त्यालाच देवमाणूस म्हणतात असे विच्यार मांडले.
आरोग्य शिबिरात गुणवंत शिक्षक राम महाजन व गजानन पवार यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला .कार्यक्रमासाठी गावकऱी मंडळी, पत्रकार बांधव यांची प्रमुख उपस्थिती होती . कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनार्धन आवरगंड यांनी केले सूत्रसंचालन माधव आवरगंड आभार शिवाजी आवरगंड यांनी केले.....
0 टिप्पण्या