🌟प्रश्नमंजुषा स्पर्धा जवळपास 3.25 कोटी रक्कमेची असून, स्टार स्पोर्टस वाहिनीवर थेट प्रक्षेपित होणार आहे🌟
परभणी : ‘फिट इंडिया’ मोहीम सन 2019 पासून देशभरात सुरू आहे. विद्यार्थ्यांमध्ये विविध क्रीडाप्रकारातून शारीरिक तंदुरुस्तीबाबत जनजागृती करण्यासाठी क्रीडा प्राधिकरण, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत राष्ट्रीय प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे. ही प्रश्नमंजुषा स्पर्धा जवळपास 3.25 कोटी रक्कमेची असून, स्टार स्पोर्टस वाहिनीवर थेट प्रक्षेपित होणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करायची आहे. या राज्य व राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेमधील स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी https:fitindia.nta.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. या मोहिमेसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणामार्फत मार्गदर्शन केले जाणार असून, वेटलिफटींग प्रशिक्षक शुभांगी कारंडे (9657109547) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.....
*****
0 टिप्पण्या