🌟राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते नितीन निर्मळ यांचा सत्कार....!


🌟पाथर्डी कोहिनुर कन्स्ट्रक्शनच्या वतीने सय्यद गुलशेर खान मामा यांनी मोतीबागेत शाल,श्रीफळ देऊन केला सत्कार🌟

प्रतिनिधी

पाथरी :-परळी तालुक्यातील हिवरा गावचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवानेते नितीन मधुकरराव निर्मळ यांनी स्व पंडित आण्णा मुंडे यांचा सिरसाळा जिल्हा परिषद गटातून ज्या हिवरा गावच्या नेत्याने पराभव केला होता त्या भाजपाच्या प्रस्थापित नेत्या सह सुंदराव सोळंके सहकारी साखर कारखाण्याच्या स्थापणे पासुन आज तागायत संचालक असलेल्या दोन्ही मात्तब्बरांना हिवरा ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत चारी मुंड्या चित करत एक हाती विजय मिळवला त्यांचा पाथरी येथे कोहिनुर कन्स्ट्रक्शन च्या वतीने सय्यद गुलशेर खान मामा यांनी मोतीबागेत शाल,श्रीफळ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या.

या वेळी बोलतांना नितीन निर्मळ म्हणाले की,कृषी मंत्री आदरनिय धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनात, वाल्मिक आण्णा कराड यांच्या सहकार्यांने आणि गत वेळी झालेला निसटता पराभव विसरुन पुन्हा सामाजिक काम केल्यान सरपंचा सह चार जागा निवडून देत ग्रामस्थांनी माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. या पुर्वीच हा विजय आम्ही स्व पंडीत आण्णा मुंडे यांच्या चरणी अर्पण केला आहे. आता मा.ना धनंजयजी मुंडे साहेबांच्या कुशल नेतृत्वात गावचा सर्वांगिन विकास साधत पाणी, शिक्षण, आरोग्य,स्वच्छता,वृक्षरोपण अशा कामावर आपले कायम लक्ष राहाणार असुन गरीब गरजुंना घरकुल मिळउन देण्यालाही प्रथम प्राधान्य असणार आहे. त्याच बरोबर शेतरस्ते,बंधारे ही कामे ही मोठ्या प्रमाणात हाती घेणार असल्याचे सांगितले. या वेळी त्यांच्या सोबत अभय संदिपानराव निर्मळ आणि पाथरी तालुक्यातील ग्रा पं चे काही सदस्य यांची उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या