🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे पाल वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांसोबत दीपावली साजरी केली...!


🌟समाजातील शेवटचा घटक असलेल्या वैदू समाजा सोबत केली भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिपावली साजरी🌟


भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज गंगाखेड विधानसभेतील ताडकळस या गावातील वैदू समाजाच्या व पालावर राहाणारया समाजाच्या वस्तीत पालावर जाऊन त्यांच्या लेकरा बाळांमध्ये दिवाळी साजरी केली. पालात राहणाऱ्या भगिनींना साडीचोळी व लेकरांना फराळाचे अन्नधान्य साहित्य आज भेट दिले. सोबत पालावरतील नागरिक माता-भगिनी व तेथील बालचिमुकल्यांनी बसून एकमेकांशी संवाद साधून ही दीपावली साजरी केली. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे गंगाखेड विधानसभेचे निवडणूक प्रमुख तथा ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी रुद्रवार यांनी आयोजित केला होता. याप्रसंगी बाळासाहेब आप्पा कापसे, सखाराम लासे ,शिवाजीराव आंबोरे, प्रताप काळे, रामभाऊ कोळेकर, शिवदास शिराळे, सतीश शिंदे, राम गवते यांच्यासह आदी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या