🌟नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत करा : आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांची लेखी मागणी.....!


🌟शासनाकडून घेतली आ.डॉ.गुट्टे यांच्या मागणीची तात्काळ दखल🌟

गंगाखेड (दि.२९ नोव्हेंबर) - दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. जनावरांच्या गोठ्यांची व नागरिकांच्या घराचीही पडझड झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत करावी. तसेच माजलगाव उजवा कालव्यातून पाण्याचे दोन आवर्तने पाणी सोडणे आणि जायकवाडी डाव्या कालव्याच्या मायनर ४९ वरखेड गेट क्र.१२२ मधून ढालेगाव बंधाऱ्यात पाणी सोडावे, अशा विविध मागण्यांचे लेखी गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना दिले आहे.

आधीच एकामागून एक येणाऱ्या संकटांमुळे शेतकरी उद्धवस्त झाला आहे. त्यातच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे झालेले नुकसान यामुळे नैराश्य पसरले आहे. शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आवश्यक त्या मदतीसाठी सकारात्मक निर्णय घ्या, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी लेखी पत्रात म्हटले आहे अवकाळी पावसाने माझ्या गंगाखेड विधानसभा मतदार संघाला अक्षरशः झोडपून काढले आहे. परिणामी, अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाली आहेत. तसेच शेतकऱ्यांचे पिक व पशुधन, घरांची व गोठयांची पडझड झाल्याने शेतकरी व नागरीक हातबल झाले असून त्यांच्यात नैराश्याचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नुकसानाची तीव्रता पाहून बागायती शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये जिरायती शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार रूपये तसेच नुकसानग्रस्त नागरीकांना आवश्यक ती मदत तात्काळ देण्यात यावी, तसेच दुष्काळसदृश परिस्थिती पाहून पाण्याची सोय व्हावी, म्हणून पाणी सोडावे, अशीही विनंती‌ कर्तव्यदक्ष आ.डॉ.गुट्टे यांनी निवेदनाद्वारे शासनास केली आहे.

एकतर कोरडा दुष्काळ आणि त्यात आता अवकाळी पाऊस आणि गारपीट असे संकट शेतकऱ्यावर कोसळले. जनावरांचे नुकसान, घरांचे, पिकांचे नुकसान झाले आहे. बरेच पंचनामे झाले आहेत. उर्वरित तातडीने होऊन जातील आणि मदतही जाहीर होईल, असाही विश्वास आ.डॉ.गुट्टे यांनी व्यक्त केला आहे दरम्यान, त्या सर्व मागण्यांची शासनाने त्वरित दखल घेतली आणि त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे सक्त आदेश मंत्रिमंडळ बैठकीत दिले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

* काळजी करू नका, सरकार तुमच्या सोबत :-

शेतकरी बांधवांनों, आम्ही तुमच्या सोबत आहोत, पंचनामे सुरू आहेत. काळजी करू नका. तुम्हाला शासन भरघोस आर्थिक मदत करेल, अशा शब्दांत आ.डॉ.गुट्टे यांनी नुकसानग्रस्तांचे सांत्वन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या