🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे झेंडूची फुले अभियानांतर्गत शेतकऱ्याचा सन्मान....!


🌟प्रयोगशील शेतकरी जनार्धन आवरगंड यांना यावेळी कृषी फाऊंडेशनच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मान🌟


पुर्णा (दि.१२ नोव्हेंबर) - पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे आज रविवार दि. 12 नोव्हेंबर रोजी येथे 'झेंडूची फुले अभियान' अंतर्गत फुलांचा भाव न करता प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडूनच खरेदी करण्यात आली. यावेळी या अभियानात येथील शब्दरंग मित्रपरिवार, मराठा सेवा संघ, डॉक्टर्स असोसिएशन, व्यापारी मंच व गावकरी नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. याप्रसंगी शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून माखणी येथील प्रयोगशील शेतकरी  जनार्धन आवरगंड यांना हिंगोली येथील झेंडूची फुले अभियानाचे उद्गाते अण्णा जगताप यांच्या कृषी फाऊंडेशनच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. 


          याप्रसंगी ताडकळस नगरीचे सरपंच गजानन आंबोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी रुद्रवार, सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव भोसले, दत्तराव आंबोरे, श्री दयानंद स्वामी, डॉ. अतुल शिंदे, डॉ. विष्णू डोंबे, डॉ. माधव दुधाटे, उपसरपंच  शेख शेहजाद,  सुरेंद्रभाऊ आंबोरे, मराठा सेवा संघ तथा प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष प्रमोद आंबोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पंडितराव भोसले, प्राचार्य अर्जून राठोड, संभाजी ब्रिगेड जिल्हासचिव साहेब शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  पद्माकरराव आंबोरे,  श्याम आंबोरे,  तानाजी कळसाइतकर,  नरेंद्र खंदारे,  बापूराव चिमटे, सतीश जवंजाळ,  प्रवीण आंबोरे,  संदीप आंबोरे,  नागनाथ भोसले, स्वराज्य संस्थेचे जिल्हाप्रमुख सचिन आवरगंड, श्री आबासाहेब बनसोडे,  सदाशिव तनपुरे, सुदाम भोसले, श्री दत्तात्रय चिमटे, श्री स्वप्निल आंबोरे, धुराजी होनमाने, श्री गजानन नाईकवाडे, श्री धम्मपाल हनवते,  दशरथ बनसोडे, श्रीकांत आंबोरे, रघुनाथ आंबोरे, राहुल सवंडकर, पवन आंबोरे आदींसह गावकरी उपस्थित होते.

          अभियानामार्फत यावर्षीपासून दरवर्षी प्रत्येक ठिकाणी एका शेतकऱ्यास पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

         यावेळी गजानन आंबोरे व श् बालाजी रुद्रवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सत्काराला उत्तर देत श्री जनार्धनआवरगंड यांनी आपली भूमिका व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रमोद आंबोरे यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहेब शिंदे यांनी केले. 


🙏🌳🙏🌳🙏🌳🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या