🌟परभणी तालुक्यातील मौजे करडगाव येथे मिलेट प्रोत्साहन अभियानांतर्गत शेतकरी मेळावा संपन्न....!


🌟या कार्यक्रमाच्या वेळेस श्री एकनाथ लंगोटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले🌟


 
परभणी : परभणी तालुक्यातील मौजे करडगाव येथे गुरुवार दि.09 नोव्हेंबर 2023. रोजी सेवा संस्था परभणी आणि अफार्म पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मिलेट प्रोत्साहन अभियानांतर्गत शेतकरी मेळावा संपन्न झाले,  शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री एकनाथ लगोटे यांनी सांगितले की पौष्टिक तृण धान्यास प्रोत्साहन देण्यासाठी 2023-2024. हे वर्ष आंतरराष्ट्रीय  तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे या तृणधान्य याण्या चे उत्पादकता वाढवून दररोजच्या आहारात तृणधान्याचा समावेश करणे आवश्यक आहे, या कार्यक्रमाच्या वेळेस श्री एकनाथ लंगोटे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की तृणधान्य दररोजच्या आहारात आणले तर यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, फायबर लोह मॅग्नीज यासारखे पोषक घटक असल्याने आपले वजन संतुलित राहते मधुमेह उच्च रक्तदाब व रक्तवाहिन्यासंबंधी रोगासारख्या विविध रोगांचा धोका कमी होतो याच कारणासाठी तृणधन्य स सुपर फूड असे महंटले जाते, या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सेवा संस्थेच्या चौधरी. सुकेशीनी यांनी असे मत व्यक्त केले की तृणधान्य आधारित अनेक प्रक्रिया उद्योग करता येतात, त्याचबरोबर शासकीय विभागाच्या विविध योजना संबंधी मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी सेवा संस्थेचे कैलास गायकवाड यांनी आपले मत व्यक्त करून या कार्यक्रमाचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या