🌟परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी मा.आ.अ‍ॅड.विजय गव्हाणे यांची नियुक्ती....!


🌟आरक्षणाची चळवळ संपेपर्यंत सत्कार स्विकारणार नाही - जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.विजय गव्हाणे

परभणी, (दि.11 नोव्हेंबर) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  परभणी जिल्हाध्यक्ष  पदावर  आपली नियुक्ती झाली आहे. पक्षाच्या माध्यमातून जनसेवा करण्याची मोठी संधी या निमित्ताने मिळाली आहे. या नियुक्तीच्या निमित्ताने उत्साहाने गावागावात जिल्ह्यातून मराठवाड्यातून अभिनंदनाचे दूरध्वनी येत आहेत. तसेच स्वागताचे, सत्कार कार्यक्रम आयोजित निमंत्रण  येत आहेत.  परंतु सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वदूर तीव्र चळवळी सुरु आहेत. आपणही मराठा आरक्षण चळवळीचा गेल्या  अनेक वर्षापासून कार्यकर्ता आहोत,  मराठा आरक्षण चळवळी नेहमीच सहभागी होत यात्रेत देखील सहभागी झालो आहोत. त्यामुळेच मराठा आरक्षण चळवळ संपेपर्यंत आपण कोणताही सत्कार, स्वागत समारंभ स्वीकारणार नाही, असा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. विजय गव्हाणे यांनी दिली.

          सत्काराच्या ऐवजी मराठा आरक्षण चळवळीत आपण सहभागी व्हावे हेच  सहकार्य असेल, यानिमित्ताने कोणीही बॅनर्स पोस्टर्स लावू नये. तसेच सतकाराचे कार्यक्रम आयोजित करू नये. आपल्यासोबत मराठा आरक्षण चळवळी मध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन गव्हाणे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या