🌟वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपिरात मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लाक्षणिक उपोषणाला सुरुवात...!


🌟सर्व समाजातील नागरिकांनी उपोषणात नोंदवला सहभाग🌟

फुलचंद भगत

वाशिम :- मराठा समाजाला सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळावे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली इथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून त्यांच्या समर्थनार्थ मंगरूळपीर  येथील सकल मराठा समाजाच्या वतीने ता 1 बुधवार पासून लाक्षणिक उपोषणाला सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात झाली आहे.लाक्षणिक उपोषणाला सकल मराठा समाजासह तालुक्यातील सर्वच समाजातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवून सहभाग नोंदवला.


जोपर्यंत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश शासन जारी करत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही. खरे, सच्चे आणि कडवट मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला बळ देण्यासाठी मंगरूळपीर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने  सर्वांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ता 1 बुधवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाक्षणिक उपोषणाला सकाळी 10 वाजता सुरुवात करण्यात आली असून पहिल्याच दिवशी सकल मराठा समाज बांधवांसह सर्वच समाजातील नागरिकांनी शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून या लाक्षणिक उपोषणाला नागरिकांनी सहभाग नोंदविला या उपोषणामध्ये शिवराज मित्र मंडळ, राम ठाकरे मित्र मंडळ,गुरुध्वज मित्र मंडळ, राम ठाकरे मित्र मंडळ यांनी पाठिंबा दर्शविला आणि सहभागी झाले होते.यादरम्यान उपोषण मंडपाला अधिकार्‍यांनीही भेटी दिल्या.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या