🌟रेल्वे परिसरात दोन गाई बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने पशू पालकांमध्ये माजली खळबळ🌟
पुर्णा :- पुर्णा शहरात मागील काही दिवसांपासून गो/गोवंशाची बेकायदेशीररित्या तस्करी होण्याचे प्रमाण वाढल्याचे प्रकार निदर्शनास येत असून शहरासह तालुक्यातुन मागील दहा दिवसात सात ते आठ गायी गायब झाल्या असल्याचे बोलले जात असून मागील काळात देखील गो/गोवंशाची गाढव, डुक्कर देखील चोरी झाल्याचे प्रकार घडले होते त्यामुळे शहरात पशू पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पुर्णा शहरात अज्ञात गो/गोवंश तस्करांचे टोळके रात्रीच्या दरम्यान गो/गोवंशांना बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन मध्य रात्रीच्या सुमारास वाहंनांद्वारे शहराबाहेर नेत असल्याचे बोलले जात असून सदरील टोळी रात्रीच्या वेळी शहरात फिरत असल्याची मोठी चर्चा शहरात रंगली आहे असाच एक गंभीर प्रकार शहरात दि.०१ नोव्हेंबर रोजी मध्ये रात्रीच्या दरम्यान रेल्वे कॉलनी परिसरातील आरआरसी ग्राउंड येथे चार गायींची चोरी झाल्याची जोरदार चर्चा होत आहे व त्यानंतर याच परिसरात दोन गाई बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या आहेत.त्यावेळी जनावरांच्या मालकांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून गायींवर उपचार केले आहेत. या तस्करीच्या घटनेमुळे शहरात पशू पालकांमध्ये मालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पशू पालकांनी आपली पाळीव जनावरे मोकाट सोडू नयेत असे जानकार नागरिकांकडून आवाहन करण्यात येत आहे.....
0 टिप्पण्या