🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या...!


🌟ऐन दिवाळीत रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना मराठा आंदोलनाचा फटका, पडेगावच्या सीमेवरून परत पाठवलं🌟 

* पंतप्रधान नरेंद्र मोदींची  सैन्य दलासोबत दिवाळी, जवानांसोबत आनंद साजरा करण्यासाठी थेट हिमाचल गाठलं ;  जिथे राम तिथे अयोध्या, जिथे तुम्ही तिथे माझी दिवाळी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जवानांना उद्देशून वक्तव्य 

* 'समाजाच्या अपेक्षांवर नांगर, यंदा दिवाळी साजरी करणार नाही', रुग्णालयाच्या डिस्चार्जनंतर मनोज जरांगेंचा निर्धार  

* ऐन दिवाळीत रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना मराठा आंदोलनाचा फटका,पडेगावच्या सीमेवरून परत पाठवलं 

* शरद पवारांची प्रकृती स्थिर, बारामतीतील गोविंदबागेत शरद पवारांना भेटायला नागरिकांची रीघ पुढील दोन दिवस घरीच नागरिकांना भेटणार 

* अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची पिकअपला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, 11 जखमी  

* गुंवतणूकदारांसाठी दिवाळी छप्पर फाड अन् मालामाल, गेल्या दिवाळीपासून या दिवाळीपर्यंत गुंतवणूकदारांनी कमावले 64 लाख कोटी रुपये

* आमटी भाकर खाऊन छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्यांनी साजरी केली 'काळी दिवाळी'; जिल्ह्यात सरसकट दुष्काळाची मागणी 

* 'कुटुंब घरात, मुलगा दारात', पणती लावताना बिबट्याने झडप घातली,  दिंडोरीत आठ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू 

* उत्तराखंडमध्ये टनेलचा भाग कोसळला, 36 मजूर अडकले, बचाव कार्य सुरू 

* भारतीसाठी खुशखबर ! तैवान 1 लाख भारतीयांना देणार रोजगार तैवान हा देश एक लाख भारतीयांना नोकरी देण्यासाठी आपली दारं खुली करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

                                                                                   * भावी डॉक्टरांची आझाद मैदानात काळी दिवाळी शेकडो संशोधक विद्यार्थ्यांचे आंदोलन

* तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी 21 मिनिटांत सव्वादोन लाख तिकिटांची विक्री; ऑनलाइन बुकिंग सुरु

* धनत्रयोदशीच्या दिवशी देशात सुमारे 41 टन सोने आणि सुमारे 400 टन चांदीचे दागिने आणि नाण्यांची विक्री झाली आहे.

* दिवाळीत पुण्यातील रस्त्यांवर सुमारे 22 हजार नवीन वाहनांची भर पडली आहे. यात पुणेकरांनी पेट्रोल, डिझेलच्या वाहनांना सर्वाधिक पसंती दिली आहे, तर इलेक्ट्रिक वाहनांना (ईव्ही) तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला आहे.

* ज्वालामुखीच्या धोक्यामुळे आइसलँडमध्ये आणीबाणी; अवघ्या 14 तासात 800 पेक्षा जास्त भूकंप

* मिका बनली जगातील पहिली AI रोबोट CEO; म्हणाली, 'मस्क आणि झुकेरबर्गपेक्षाही मी सरस'!  एआय, म्हणजेच आर्टिफिशिअल इंटिलिजन्समुळे कित्येकांच्या नोकऱ्या जातील याची भीती व्यक्त करण्यात येते.

* शिक्षण विभाग ऑनलाईन चॅटबॉट हजेरीच्या तयारीत, मात्र राज्यातील शाळांमध्ये ना वीज ना इंटरनेट ! राज्यात शालेय स्तरावर नवीन शैक्षणिक धोरण राबविण्याची जय्यत तयारी सुरू असली तरी अद्यापही तब्बल 27 हजार शाळांमध्ये वीजच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या