🌟चुडाराम बल्हारपुरे यांच्या कथा व कवितेला पुरस्कार.....!


🌟चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील राज्य पुरस्कार प्राप्त नाटककार आहेत🌟

गडचिरोली (दि.१९ नोव्हेंबर) - गोवा राज्यातील प्रसिद्ध आरती मासिकातर्फे दरवर्षी कथा व कविता स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यंदा आयोजित करण्यात आलेल्या "पुण्यातील ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर पुरस्कृत उत्कृष्ट कथास्पर्धा व उत्कृष्ट कवितास्पर्धा- २०२३" मध्ये  झाडीपट्टीतील साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या "श्रृंखला" या कथेस द्वितीय क्रमांकाचे व "रानगर्भ फुलत आहे" या कवितेस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे "आरती" मासिकाचे संपादक प्रणव भागवत व भारत गावडे यांनी कळविले आहे. एखाद्या दिवाळी अंकात एकाच वेळी एकाच साहित्यिकाच्या दोन साहित्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या दोन्ही पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम असे आहे. वरील दोन्ही साहित्यांना यंदाच्या आरती दिवाळी अंकात प्रकाशित करण्यात आले आहे. 

         चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील राज्य पुरस्कार प्राप्त नाटककार आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार प्राप्त झालेले आहे. आजपर्यंत त्यांची विविध १३ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध स्तरावरील अनेक पुरस्काराने ते सन्मानीत आहेत. महामृत्युंजय मार्कंडेश्वर, बहूढंगी समाधीवाले बाबा, स्पेशल रिपोर्ट, धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा व गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.

          चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे, प्राचार्य डॉ.श्याम मोहरकर, प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम, प्रा.एस.एस.जगताप, प्रा.डॉ.माधव कांडणगीरे, प्रा.डॉ.राजकुमार मुसणे, प्रा.नवनीत देशमुख (साहित्यिक), लक्ष्मीकमल गेडाम (साहित्यिका), मधुश्री प्रकाशनचे प्रा.पराग लोणकर (प्रकाशक), डॉ.एस.एन.पठाण, डॉ.परशुराम खुणे, प्रमोद बोरसरे, कुसूमताई आलाम (साहित्यिका), हिरामण लांजे (साहित्यिक), प्रा.प्रब्रम्हानंद मडावी, प्रा.डॉ.बावनकुळे, नरेश बावणे, उपसंपादक देशोन्नती, पुंडलिक भांडेकर (पत्रकार) व इतर साहित्यिक मित्रांनी अभिनंदन केले आहे. अशी माहिती श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींनी आमच्या प्रेस कार्यालयास दिली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या