🌟सकल धनगर समाजाच्या वतीने गुरुवारी अजदारपुर ते परभणी भव्य मशाल रॅलीचे आयोजन.....!


🌟परभणी येथील सकल धनगर समाजाच्या वतीने हे आंदोलन शांततामय मार्गाने करण्यात येणार🌟

परभणी (प्रतिनिधी) - परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातल्या मौजे आजदापूर येथील सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाच्या अनुसुचित जाती एस.टी.च्या आरक्षण अंमल बजावणी करण्याच्या मागणीसाठी उद्या गुरुवार दि.०२ नोव्हेंबर रोजी अजदारपुर ते परभणी मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

परभणी येथील सकल धनगर समाजाच्या वतीने हे आंदोलन शांततामय मार्गाने करण्यात येणार असून मौजे आजदापुर येथील सकल धनगर समाज संवैधानिक आरक्षण अंमलबजावणी संघर्ष समितीच्या वतीने कायदा व सुव्यवस्था आणि शांततेच्या दृष्टीने शांततामय मार्गाने आरक्षण क्रांतीची क्रांती मशाल घेऊन मौजे आजदापुर ते परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी लॉगमार्च काढण्यात येणार आहे.

पायी लॉगमार्चचा मार्ग पुढील प्रमाणे: मौजे आजदापुर, भाटेगाव फाटा, नांदेड रोड (मेन रोड), पूर्णा टी पॉईट, माटेगाव, नावकी फाटा, लक्ष्मीनगर फाटा, कात्नेश्वर, नांदगाव, राहटी फाटा, त्रिधारा फाटा, आसोला फाटा, दत्तधाम मंदिर, खानापुर फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी असा राहिल. तसेच सोबत छोटे खानी ध्वनीक्षेपक असेल, या मशाल रॅलीला धनगर समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या