🌟परभणी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी या मागणीसाठी बैठक संपन्न....!


🌟बैठकीत दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याच्या मागणीसाठी दि.१६ नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय आंदोलनाचा इशारा🌟 


परभणी : परभणी परभणी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी तसेच जायकवाडी धरणातून मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे,पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली,अशा विविध मागण्यांसाठी पाथरीचे आमदार मा. सुरेशराव वरपूडकर यांच्या अध्यक्षतेखाली व कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीत बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी शिवसेना (उबाठा) विशाल कदम यांनी परभणी जिल्ह्यातील विकासासह शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आ.सुरेशराव वरपूडकर यांच्या नेतृत्वाखाली व कॉ.रजन क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली निद्रिस्त सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे यावेळी बैठकीत मार्गदर्शन करतेवेळी म्हणाले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती परभणीचे सभापती पंढरीनाथ घुले पाटील,धोंडिरामजी चव्हाण,राम भाऊ घाडगे,भगवान वाघमारे,बालासाहेब रेंगे,अभय कुंडगीर,पंजाबराव देशमुख,सोनाली देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली.. सदरील बैठकीमध्ये वरील मागण्यांसाठी दि. १६ नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय मोठे आंदोलन उभारण्यात येणार आहे असे सर्वांच्या संमतीने ठरले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या