🌟यावेळी दिग्दर्शक,अभिनेता योगेशजी भोसले यांनी दै.क्रांतीशस्त्रला पुढील वाटचालीस सुभेच्छा दिल्या🌟
परभणी (दि.१९ नोव्हेंबर ) - परभणी जिल्ह्याच्या माती मध्ये गेली तिन वर्षांपासून सातत्यपूर्ण शेतकरी, शेतमजुर, कष्टकरी, वंचित, शोषित, पिडीत, उपेक्षीत समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी क्रांतिज्योती, क्रांतीसुर्याचे ब्रम्हास्त्र (शेतकऱ्याचा आसुड) घेवून लोकांच्या हक्कासाठी झगडण्याचा संकल्प करुन त्यांचे सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतीक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक प्रश्न, समस्या, वेदना, म्हणणे, जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी दैनिक क्रांतीशस्त्रच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील मौजे सिरकळस - येथील संपादक धम्मपाल यादवराव हानवते हे सातत्याने प्रयत्न करत आहे. या दैनिक क्रांतीशस्त्रच्या या दिवाळी अंकाचे विमोचन 'वन फोर थ्री' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेता सिरकळस - परभणी जिल्ह्याचे भुमीपुत्र योगेशजी भोसले यांच्या हस्ते दैनिक क्रांतीशस्त्र या वृत्तपत्रांचे विमोचन करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक यांचे वडील पांडुरंगराव भोसले, संपादक धम्मपाल हानवते, मंगेश भोसले यांच्यासह अदीची उपस्थिती होती. यावेळी दिग्दर्शक,अभिनेता योगेशजी भोसले यांनी पुढील वाटचालीस सुभेच्छा दिल्या...
0 टिप्पण्या