🌟परभणी 'चॅम्पियन्स' चे एक दिवसीय प्रशिक्षण पार पडले......!

     


🌟या कार्यशाळेचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे साहेब यांनी केले🌟           

परभणी (दि.03 ऑक्टोबर) - जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा महिला व बालविकास विभाग, परभणी युनिसेफ व  एसबीसी  अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 03 नोव्हेंबर 2023 रोजी बालविवाह प्रतिबंधक अधिनीयम व बालविवाहमुक्त परभणी अभियाना चा दुसरा टप्पा या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे साहेब यांनी केले.

          बालविवाह मुक्त परभणी जिल्हा हे अभियान सध्या दुसऱ्या टप्प्यात असून त्यामध्ये 50 चॅम्पियन्स ची निवड करण्यात आलेली आहे. त्या 50 चॅम्पियन्स ना मार्गदर्शन करताना माननीय जिल्हाधिकारी यांनी सदर अभियाना संदर्भात झोकून देऊन काम करण्याचे आवाहन केले आहे. सदर प्रशिक्षण कार्यशाळेचे प्रास्ताविक एसबीसी चे विकास कांबळे यांनी केले त्यानंतर श्री कैलास तिडके (जिल्हा महिला बाल विकास अधिकारी,परभणी)यांनी सदरील कार्यशाळेतील चॅम्पियन्स ना बालविवाह मुक्त परभणी अभियाना बाबत व बालविवाह प्रतिबंधक संबंधी प्रशिक्षण दिले. त्यामध्ये चॅम्पियन्सना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. तसेच एसबीसी थ्री चे निशितकुमार सर व सरिता शंकरन यांनी बालविवाह बाबत वेगवेगळे अनुभव कथन केले  व बालविवाह थांबवताना वेगवेगळ्या अडचणी कशा पद्धतीने सोडवायच्या याबाबत मार्गदर्शन केले. 

      सदरील प्रशिक्षण दरम्यान बाल कल्याण समिती परभणी चे अध्यक्ष ऍड. कातनेश्वरकर सर, व बालकल्याण समितीचे सर्व सदस्य तसेच  जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी ,जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सर्व अधिकारी कर्मचरी child line, विविध विभागांचे प्रमुख व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या