🌟युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान🌟
पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथून जवळच असलेल्या फुलकळस ता.पुर्णा येथील ग्रामीण भागातील नागरिकांशी नाळ असलेले सामाजिक कार्यात आपल्याला समाजकार्यामध्ये झोकून देणारे पत्रकार तथा ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवानंद गणपतराव नावकिकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी त्यांची परभणी जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्तीपत्र देऊन निवड केली.गोरगरीब ,शेतकरी,शेतमजूर यांच्यावर होणाऱ्या अडचणीला वाचा फोडण्यासाठी तसेच पत्रकारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी संघटना मोठ्या प्रमाणात काम करत आहे अशीच कार्य आपल्या हातून घडावी अशी गणेश कचलकवार म्हणाले याच वेळी देवानंद गणपतराव नावकिकर यांना युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या परभणी जिल्हा उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र मिळतात पत्रकार मंडळीकडून, ताडकळस परिसरातील लोकप्रतिनिधी मंडळीकडून देवानंद गणपतराव नावकिकर यांच्यावर सर्वा कडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे....
0 टिप्पण्या