🌟रिपब्लिकन सेनेच्या वतीने दीक्षाभूमी नागपूर ते चैत्यभूमी दादर मुंबई पर्यंत संविधान बचाव यात्रा निघाली आहे🌟
नागपूर येथून या यात्रेची सुरुवात झाली रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदरशनाखाली ही यात्रा निघाली आहे,विविध जिल्ह्यातून प्रवास करत ठीक ठिकाणी सभा घेत ही यात्रा परभणी मध्ये दिनांक 18 नोव्हेंबर रोजी दाखल झाली.
रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर हे संविधान यात्रेचे नेतृत्व करत आहेत.त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्ते यात सहभागी झाले आहेत.आज परभणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ ही रॅली आली असता रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष लोकनेते विजय वाकोडे यांनी स्वागत केले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत भव्य रॅली काढण्यात आली जिंतूर रोड वरील सखा गार्डन मंगल कार्यालयात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास मुख्य मार्गदर्शन काकासाहेब खंबाळकर,तसेच अध्यक्षस्थानी लोकनेते विजय वाकोडे प्रमुख अतिथी म्हणून भैयासाहेब भालेराव,माधवराव जमदाडे,देवेश पातोडे,महेंद्र सानके,विश्वजित वाघमारे, अर्जुन पंडित, राजकुमार सुर्यवंशी,आशिष वाकोडे,सिद्धांत सुर्यवंशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या प्रसंगी या सभेला संबोधित करताना काकासाहेब खंबाळकर म्हनाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला हक्क व अधिकार दिलाच पण माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला,आज याच हक्क व अधिकार हिरावून घेण्याचा डाव करत संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे,आपण सर्वांनी एकत्र येऊन संविधान वाचविण्यासाठी लढा लढणे गरजेचे आहे.
अध्यक्षीय भाषणात लोकनेते विजय वाकोडे म्हणाले की पिढ्यान् पिठ्या आम्हला गुलाम म्हणून हिन वागवनुक देण्यात आली, निसर्गाने दिलेल्या पाण्यावर ही आमचा अधिकार नव्हता,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आम्हला माणूस म्हणून ओळख तर दिली पण अनेक पिढ्यांच्या उद्धार केला, आज मनुवादी षडयंत्र करूनसंविधान बदलण्याची भाषा करत आहेत,त्याचा हा डाव हाणून पाडणे गरजेचे आहे.
कार्यक्रमात परिवर्तनवादी व धम्म चळवळीत सक्रिय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा तसेच महिला मंडळाचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.यात सेवानिवृत्त पशुसंवर्धन अधिकारी किरण मानवतकर, इंजी.अरविंद भक्ते, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असणाऱ्या साहित्यिक कवी.प्राध्यापक ज्योती धुतमल यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा युवा अध्यक्ष आशिष वाकोडे यांनी केले तसेच सूत्रसंचालन राहुल वाहिवाळ तर उपस्थितांचे आभार शहरअध्यक्ष निलेश डूमणे यांनी मानले.सामूहिक राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समरोप करण्यात आला.
0 टिप्पण्या