🌟परभणी जिल्ह्यातील सर्व शाळांना दि.०६ नोव्हेंबर पासून दिवाळी सुट्ट्यांचा आदेश जारी....!


🌟जिल्हा परिषद शिक्षण विभाग : सुट्यांच्या गोंधळाचे तीसरे पत्र🌟

परभणी (दि.०४ नोव्हेंबर) : परभणी जिल्ह्यातील सर्व शाळांना ०६ नोव्हेंबर पासूनच सुट्ट्या लागू राहतील असा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकार्‍यांनी जाहीर केला आहे.

           यापूर्वीही या विभागाने ०६ नोव्हेंबर पासूनच दिवाळी सुट्ट्यांचा निर्णय जाहीर केला होता. परंतु, वरिष्ठ अधिकार्‍यांनी संपूर्ण राज्यातील दिवाळी सुट्ट्यात समन्वय असावा म्हणून ०६ ऐवजी ०९ नोव्हेंबर पासून दिवाळी सुट्ट्या जाहीर केल्या. या प्रकाराने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीसुध्दा गांगरुन गेले. या पार्श्‍वभूमीवर परत जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर व प्राथमिक शिक्षणाधिकारी गणेश शिंदे यांनी आपआपसात चर्चा करुन 6 नोव्हेंबरपासून दिवाळी सुट्ट्यांचा निर्णय जाहीर केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या