🌟पुर्णेतील नागरीक ऐन दिपावली सनासूदीत मागील १५ दिवसांपासून पाण्यापासून वंचित....!


🌟बेजबाबदार मुख्याधिकारी जोपसताय भ्रष्ट गुत्तेदारांचे हित ?🌟


पुर्णा : पुर्णा नगर परिषद प्रशासनाच्या बेजबाबदार व अकार्यक्षम कारभारामुळे शहरातील नागरिक मुलभूत नागरी सुविधांपासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास येत असून ऐन दिपावली सनासूदीत मागील पंधरा दिवसांपासून नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेतील नळांना पाणी येत नसल्याने पाण्याअभावी नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहेत.राज्य शासनाने कोट्यावधी रुपयांच्या शासकीय निधीतून पुर्णा नदीपात्रावर तब्बल ८५ दरवाजे असलेल्या कोल्हापूरी बंधाऱ्याची निर्मिती केली खरी परंतु या दरवाजाच्या लोखंडी प्लेटा योग्य पध्दतीने बंद होत नसल्याने या दरवाजातून पाणी वाहून जाण्याचा गंभीर प्रकार होत असतांना या दरवाजांची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याऐवजी या दरवाजांना पॉलिथीन लावण्यावर नगर परिषद प्रशासन प्रत्येक वर्षी लाखों रुपयांचा खर्च करीत असल्याचा गंभीर प्रकार देखील समोर आला आहे.

पुर्णा नदीपात्रावर बांधण्यात आलेल्या कोल्हापूरी बंधाऱ्याला असलेल्या ८५ गाळ्यांनच्या दरवाज्यांना तब्बल ५३५ लोखंडी प्लेटा असून यातील ३० ते ३५ दरवाज्यांच्या लाखों रुपयांच्या प्लेटा अज्ञात भामट्यांनी पळवल्या की पाणीपुरवठा योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी खपवल्या ? या संदर्भात कायदेशीर कारवाई करुन शोध लावण्याची जवाबदारी नगर परिषदेतील मुख्याधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी/कर्मचाऱ्यांनी पार पाडली किंवा नाही हा प्रशासकीय व्यवस्थेचा भाग असला तरी याचा गंभीर परिणाम मात्र शहरातील नागरिकांना भोगावा लागत असून बंधाऱ्यातील पाण्याचा संपूर्ण साठा वाहून गेल्यामुळे उन्हाळा लागण्याच्या चार महिन्यांपूर्वीच ऐन हिवाळ्यात व ऐन दिपावली सनाच्या काळातच शहरातील नागरिकांना तिव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून शहरात मांगील पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला असतांना नगर परिषदेचे प्रशासक जीवराज डापकर व मुख्याधिकारी युवराज पौळ पर्यायी व्यवस्था करण्याकडे लक्ष देत नसल्यामुळे नागरीकांमध्ये तिव्र असंतोष निर्माण झाला असून पुर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी युवराज पौळ यांच्या अकार्यक्षम व गलथान कारभारामुळे पुर्णा शहरातील नागरिक नागरी सुविधांपासून वंचित राहत असतांना मात्र मुख्याधिकारी पौळ शहरातील विविध भागात झालेल्या व होत असलेल्या निकृष्ट व बोगस कामांची बिल काढण्याकडे विशेष लक्ष देत असल्याचे निदर्शनास येत आहे शहरात पाणीपुरवठा योजनेसह स्वच्छतेचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे निदर्शनास येत असून शहरातील स्वच्छतेअभावी तुंबलेल्या नाल्या जागोजागी साचलेले कचऱ्यांची ढिगार,अल्पकालावधीत उध्वस्त झालेले नवीन रस्ते नाल्या हा सर्व प्रकार नगर परिषद प्रशासनाच्या निष्क्रिय व अकार्यक्षम कारभाराची लक्तरे वेशीवर टांगत आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या