🌟परभणी जिल्ह्यातील पुर्णेतील तहसील कार्यालयाचे प्रवेश द्वार पेटविण्याचा प्रयत्न......!


🌟प्रत्यक्षदर्शनींनी तसेच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली व आग आटोक्यात आणली🌟

परभणी (दि.०१ ऑक्टोंबर) :  पुर्णा येथील तहसील कार्यालयाचे प्रवेश द्वारावर काही अज्ञातांकडून दगडफेक करीत प्रवेश द्वारावर पेट्रोलचे जळते बोळे फेकून पेटवण्याचा प्रयत्न आज बुधवार दि.०१ नोव्हेंबर २०२३ रोजी झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. 

त्यामुळे तहसील कार्यालयाच्या समोरच्या प्रवेशद्वाराचे लाकडी दरवाजे जळाले. प्रत्यक्षदर्शनींनी तसेच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली व आग आटोक्यात आणली. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी गांभीर्याने दखल घेवून अज्ञात व्यक्तींची सिसिटीव्ही कॅमेर्‍याच्या आधारे ओळख पटवून पकडण्याची कारवाई सुरु केली असल्याचे समजते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या