🌟नांदेड येथील दिवाळी गुरुद्वारा बोर्डाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बोनस व पगारवाढीच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन....!


🌟दिवाळी महोत्सव करिता एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्याची मागणी🌟


नांदेड (दि.०९ नोव्हेंबर) - नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्ड अंतर्गत येणारे यात्रेनिवास व परिसराचे बाह्य स्त्रोत अंतर्गत  130 कर्मचाऱ्यांनी दिवाळी बोनस व पगार वाढ करण्याच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू करून बीव्हीजी लिमिटेड पुणे व सचखंड गुरुद्वारा बोर्ड यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.


     सचखंड गुरुद्वारा परिसर व यात्री निवास यांचे बाह्यस्रोत अंतर्गत सुपरवायझर, इलेक्ट्रिशन, प्लंबर,  कारपेंटर,व हाऊस कीपर असे 130 कर्मचारी हे बीव्हीजी लिमिटेड पुणेचे कंत्राटी कर्मचारी सचखंड बोर्ड मध्ये काम करतात. या कर्मचाऱ्यांना दिवाळी महोत्सव करिता एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्यात यावा अशी मागणी सर्व कर्मचाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे बीव्हीजी कंपनीचे शाखा व्यवस्थापक आनंद कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.               मागील 14 महिन्यापासून गुरुद्वारा शाखेचे टेंडर बीव्हीजी कंपनीला देण्यात आले आहे. त्यांचे अधिकारी सचिन चिद्रावार व अरुण जगताप यांनी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी फेस्टिवल बोनस देण्याचे आश्वासन दिले होते. दीपावली सण चार दिवसांवर आला असून देखील या कंपनीतर्फे वर्करला तीन हजार ते पाच हजार बोनसच्या नावाने दिले जात आहेत. परंतु त्यावर महागाईमुळे त्रस्त कर्मचाऱ्यांनी एक महिन्याचा पगार  दिवाळी बोनसच्या रूपाने देण्यात यावा तसेच पुढील महिन्यापासून कर्मचाऱ्याला किमान दहा हजार व सुपरवायझरला पंधरा हजार रुपये पगार रूपाने देण्यात यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे बीव्हीजीचे व्यवस्थापक व गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक यांना केली आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे.


    या निवेदनावर जगदीपसिंग नंबरदार, संतोकसिंग सिद्धू ,अरविंदरकौर गाडीवाले, जगदीपसिंग रागी, गुरसेवकसिंग कारागीर, नरेंद्रपालसिंग महाजन,  अजितसिंग पाटनूरवाले, प्रेमजीतसिंग शिलेदार, हरमिंदसिंग खालसा, साहेबराव कांबळे, नारायण उदासी, तुळशीराम डोईफोडे यांच्यासह अनेकांच्या साक्षर आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या