🌟साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा मार्फतरोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन...!


🌟 रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे नांदेड येथे दि.24 नोव्हेंबर रोजी आयोजन🌟

परभणी (दि.20 नोव्हेंबर) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाच्या प्रचार व प्रसारासाठी नांदेड येथे दि. 24 नोव्हेंबर, 2023 रोजी वेळ सकाळी 11.00  वाजता मांतग व तत्सम 12 पोट जातीतील समाज बांधवांसाठी महामंडळामार्फत रोजगार व स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

नांदेड व परभणी जिल्ह्यातील मांतग व तत्सम 12 पोट जातीतील समाज बांधवांसाठी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ समाजातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याकरिता तसेच सदर योजनांचा प्रचार व प्रसारासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उपस्थित मातंग समाज बांधवांना मार्गदर्शन करण्याकरिता महाव्यवस्थापक व व्यवस्थापकीय संचालक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुबंई यांची उपस्थिती असणार आहे. तसेच समाजातील कार्यकर्ते, यशस्वी उद्योजक, महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी, पुरस्कार विजेते मान्यवर व नामांकित व्यक्ती यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी समाज बांधवांनी बहुसंख्येने या मेळाव्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, ग्यानमाता शाळे समोर, नांदेड येथे उपस्थित राहावे असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा व्यवस्थापक आर. एन. पवार यांना केले आहे...... 

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या