🌟आदर्श संस्कारक्षम माता जिजाबाई बानलेवाड काळाच्या पडद्याआड🌟
पुर्णा (दि.04 नोव्हेंबर)- पुर्णा शहरातील शिक्षक कॉलनी येथील जिजाबाई लक्ष्मण बानलेवाड यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ब्रेन स्ट्रोक आजाराने दिनांक 31 ऑक्टोबर 2033 रोजी सकाळी दोन वाजता दुःखद निधन झाले.स्वभावाने अतिशय धार्मिक भजन कीर्तन या मध्ये कमालीच्या रस असणाऱ्या समाजातील गोर गरीब दुःखी कष्टी अडचणीत असणाऱ्यांना मदत करण्याचा त्यांच्या स्वभावा मुळे त्या पूर्णा शहरात सुपरिचित होत्या.
दररोज भल्या पहाटे उठून श्री गजानन महाराज मंदिर येथे त्या दर्शनासाठी जात.जवळपास 1 तास त्या ठिकाणी त्या भजन कीर्तन करत.निसर्गतः गोड गळ्याची देनगी त्यांना लाभली होती.संताचे अभंग भारुड गवळण त्यांच्ये मुखोदगत होते.रम्य सकाळी त्यांचे भजन काकड आरती वातावरण प्रसन्न मंगलमय होत असे. अन्नदान करण्या मध्ये त्यांना आवड होती."जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोच साधु ओळखावा देव तेथेच जानावा."दारा समोर आलेला भिका री त्याला त्यांनी उपाशी पोटी कधी जाऊ दिले नाही.वर्षातून तीन वेळा शिक्षक कोलीनी येथील सर्व समाज बांधवांना माता भगिनी यांना त्या अतिशय प्रेमाने जेऊ घालत.
पंढरपूर ,आवंढा नागनाथ या तीर्थक्षेत्री वारी मध्ये त्या पायी जात.
सेवा निवृत्त कर्तव्य दक्षपोलीस अधिकारी आदरणीय लक्ष्मण बान ले वाड यांच्या त्या समर्पित सहचारिणी होत्या.अस म्हटल्या जात प्रत्येक यशस्वी पुरुषा पाठीमागे ऐका स्त्रीचा हात असतो.मग ती आई बहीण पत्नी असु शकते त्यांच्या सर्वांगीण प्रगती मध्ये पत्नी या नात्याने त्यांचा मोठा वाटा होता.
पोलिस अधिकारी अत्यावश्यक सेवेचा भाग बाहेरगावी त्यांची नोकरी असायची बदल्या व्हायच्या अशा वेळी सर्व मुले मुली सासू सासरे यांची अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी देखभाल केली. सासु सासरे यांना त्यांनी आई वडीला समान दर्जा दिला होता.अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी सेवा केली.कोणतीही कमी पडू दिली नाही.अखेरचा श्वास दोघांनीही जिजाबाई यांच्या मांडीवर घेतला.सर्व गरीब नातेवाईकांना त्यांनी मायेचा आधार दिला.आपल्या विधवा बहिणीची मुलगी धुरपदा बाई हीचे संगोपन लग्न व आईचे ममतेने बाळंतपण करून दिले.तेही आपल्या पतीच्या अनुपस्थिती मध्ये.कारण या कालखंड मध्ये बानलेवा ड साहेब ट्रेनिंग च्या निमित्ताने बाहेर होते.त्यांनी आपल्या सर्व मुलावर मुलीवर चरित्र नीतिमत्ता परोपकार सेवा भाव सदाचाराचे धडे दिले. जेस्ट चिरंजीव शिवाजी एलोकट्रोनिक उद्दोगा मध्ये परभणी येथे प्रगती पथावर आहे.दुसरे चिरंजीव गजानन
आणि साईराज यांच्ये माहेश्वरी डिजीटल प्रिंटिंग व पेंटिंग उद्दोग आहे.त्यानी या उद्दोगाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.सुकन्या शीलाबाई विव हीत असून सासरी सुख समाधानात आहे.आपल्या आई प्रमाणे आपले सासू सासरे यांची मनोभावे सेवा करत आहे.
लक्ष्मणराव बा नलेवाड यांनी ३८ वर्षाची प्रदीर्घ सेवा केली.पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक असा त्यांचा सेवेचा चढता आलेख खाकी वर्दीतील मानवतेचा माणुसकीचा स्पर्श असलेला संवेदनशील माणूस म्हणून पोलिस खात्या मध्ये त्यांनी आपली ओळख निर्माण केली.गुन्हेगाराचा कर्दनकाळ व सज्जनांचा पाठीराखा अशी त्यांची प्रतिमा होती.पोलिस खात्यातील कायद्याचे सखोल ज्ञान त्यांच्या कडे होते.वरिष्ठ अधिकारी महत्वाचे तपास कामे त्यांच्यावर सोप वित
असत.अनौपचारिक गप्पा गोष्टी करताना
बा नलेवाड साहेब आपल्या यशस्वी पोलिस सेवेला माझी त्याग सेवा समर्पण अंगी असलेली पत्नी जिजा हीचा मोलाचा वाटा होता.
सा डे तिन महिन्या पूर्वी जिजाबाई यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता.नांदेड येथील सुपर स्पेशाली टी आधार हॉस्पिटल येथे भरती केले होते. त्या कोमात गेल्या होत्या.सलग तीन महिने त्यांच्या सूना व मुलांनी त्यांची शुश्रुषा व सेवा केली सेवेच्या बाबत त्या कोठेही कमी पडल्या नाहीत.दिनांक 5 नोव्हेंबर 2023 या दिवशी शिक्षक कोलीनी येथे दुपारी 1 वाजता त्यांच्या ते रवीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
त्यांच्या विचाराला कार्याला पावन स्मुर्तीला विनम्र अभिवादन
भावपूर्ण श्रद्धांजली...!
श्रीकांत हिवाळे सर
पुर्णा.
0 टिप्पण्या