🌟परभणी येथील बी रघुनाथ सभागृहात आयुर्वेदिक व्यासपीठ महोत्सव संपन्न...!


 


🌟या कार्यक्रमास उदघाटक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी प्रामुख्याने उपस्थिती🌟 


पूर्णा (दि.०६ नोव्हेंबर) - भरडधान्य व तृणधान्य विविध भाज्या खाल्याने निरोगी निरामय जिवन जगता येते तरुणांना शाळेतच भरडा , कन्या , खारोड्या याचे बाळकडु पाजले तर जिवनाला चांगले वळण लागेल अन्यथा पिझ्झा बर्गर खाऊन आतडे निकामी झाल्यावर समजून उपयोग नाही तोपर्यंत पिढ्या नष्ट होतील असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी केले.

           येथील बी रघुनाथ सभागृहात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत गटातील पदार्थ प्रदर्शन अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांच्या वतीने (ता.०५) येथे आयोजित आयुर्वेदिक व्यासपीठ महोत्सव कार्यक्रमात, पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रम अंतर्गत पौष्टिक तृणधान्य व त्यापासून बनवलेले पदार्थ याचे स्टॉल उभारणी करण्यात आली होती .    विक्रीसाठी आलेल्या दुकानाचे उद्घाटन परभणी जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रताप काळे,सौ.ज्योत्स्ना काळे यांच्या हस्ते करण्यात आले  कार्यक्रमास उपस्थित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी  रवी हरणे, तंत्र अधिकारी डॉ. संदीप जगताप , तालुका कृषी अधिकारी   नित्यानंद काळे,  निलेश अडसुळे व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

      यावेळी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत  परभणी जिल्ह्यातील स्थापन असलेले महिला बचत गट , पुरुष बचत गटातील सदस्यांनी तालुका कृषी अधिकारी परभणी, नित्यानंद काळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रमोद रेंगे आणि सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी, स्वाती घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली तृणधान्याचे वेगवेगळे पदार्थ, कुरड्या,पंधरा प्रकारच्या पापड्या, खारवड्या,जात्यावर दळलेल्या दाळी, गावरान आंब्याचे लोणचे, सुगंधी उठणे तेल घाण्याचे तेल ,मध, राजगिरा भाजी, राजगिरा लाडू, पौष्टिक तृणधान्य (ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा,राजगिरा)  पासून बनवलेले पदार्थ पंडित थोरात खानापूर, मीरा जनार्धन आवरगंड,छाया शिंदे, रामेश्वर साबळे,प्रकाश हरकळ,शशिकांत खडीकर,शिवाजी घुले  या सर्वांनी आणलेले पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध होते, तसेच तृणधान्याची रांगोळी रेखाटून या कार्यक्रमाचे आकर्षण वाढवण्यात आले, आत्मा अंतर्गत गटांचं अतिरिक्त जिल्हाधिकारी परभणी आत्मा अंतर्गत गटांचं भरभरून कौतुक करण्यात आलं, कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हर्षा कौसडीकर, अमोल शिंदे, सुयोग लोंढे, दिपाली लोंढे,  भकते या सर्वांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजुषा काढणे यांनी केले . सूत्रसंचालन डॉ. संदीप चव्हाण अंजली निरस  यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. विनोद पत्की यांनी केले...

🌟नियमित आहारात रानभाज्या भरडधान्य यांचा वापर करा - ज्योत्स्ना काळे 

      प्रत्येक मनुष्याने आपापल्या नियमित आहारात मोठ मोठ्या हॉटेल मधील मसालेदार पदार्थ खाण्यापेक्षा शेतकऱ्यांनी पिकविलेल्या रानभाज्या तसेच भरडधान्य यांचा वापर केल्याने मनुष्याचे आयुष्य वाढत असते असे यावेळी बोलतांना ज्योत्स्ना काळे या म्हणाल्या......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या