🌟परभणी जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा...!


🌟शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख विशाल कदम व आ.डॉ.राहूल पाटीलांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी🌟 


परभणी (दि.०६ नोव्हेंबर) - परभणी जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शिवसेना (उबाठा) गटाच्या वतीने जिल्हा प्रमुख विशाल कदम व आमदार डॉ.राहूल पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सोमवार दि.०६ नोव्हेंबर रोजी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

जिल्हाधिकारी गावडे यांना निवेदन देण्यास गेलेल्या शिष्टमंडळात यावेळी सहसंपर्कप्रमुख डॉ विवेक नावंदर,परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पंढरीनाथ घुले,माजी सभापती गंगाप्रसाद आणेराव,दशरथअप्पा भोसले,ज्ञानेश्वर पवार,संग्राम जामकर , हनुमान पोळ, राम खराबे, संजय साडेगांवकर, मधुकर निरपणे, भगवान पायगण, मुंजा कोल्हें, अरविंद देशमुख मुंजा कदम आदींसह इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या