🌟नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे मा.सचिव तथा कामठा नगरीचे उपसरपंच स्व.रणजितसिंघ कामठेकर यांचे दुःखद निधन...!


🌟स्व.रणजितसिंघ कामठेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने झाले दुःखद निधन🌟 

नांदेड (दि.१३ नोव्हेंबर) - नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव तथा कामठा नगरीचे विद्यमान उपसरपंच स्व.सरदार रणजितसिंघ कामठेकर यांचे आज सोमवार दि.१३ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ०१-३० वाजेच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. 

त्याच पार्थिव आज सोमवार दि.१३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी  ०७-०० वाजेपर्यंत कामठा येथील त्यांच्या निवास्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यांचा अंत्यविधी उद्या मंगळवार दि.१४ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०-०० वाजता [दहा वाजता] नांदेड येथील त्यांचे राहते घर खालसा कॉलनी येथून अंत्ययात्रा निघून नगिना घाट येथे होईल .

गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव तथा कामठा नगरीचे विद्यमान उपसरपंच सरदार स्व.रणजितसिंघ कामठेकर हे अल्पसंख्यांक शीख समाजातून येऊन सुद्धा आपल्या मितभाषी व प्रेमळ स्वभावाच्या व कर्तृत्वाच्या बळावर तालुक्यात व जिल्ह्यात आपली वेगळी छाप त्यांनी उमटवली...अतिशय प्रेमळ व निस्वार्थ व्यक्तीला आज आम्ही मुकलो आहोत..ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो व हे दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना परमेश्वर देवो हिच प्रार्थना.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या