🌟पुर्णा तालुक्यातील गौर शिवारातील शेतकरी प्रताप जोगदंड यांच्या शेतातील २ एक्कर उस शॉर्ट सर्किट मुळे जळाला....!


🌟शेतकरी जोगदंड यांचे ४ लाख रुपयांचे नुकसान : जळालेल्या ऊसाचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी🌟 


पुर्णा (दि.०१ नोव्हेंबर) - पुर्णा तालुक्यातील गौर येथील गौर शिवारातल्या गट क्रमांक ३८२ मध्ये शेतकरी प्रताप जोगदंड यांची एक हेक्टर शेतजमीन असून यात त्यांनी उसाची लागवड केली आहे सदरील शेतातील उसावरुन जाणाऱ्या विद्यूत वहिन्यांमध्ये दि.३१ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी १२-०० वाजेच्या सुमारास घर्षण होऊन शेतकरी प्रताप जोगदंड यांच्या शेतातील उभ्या उसाला लागलेल्या आगीमुळे त्यांचं जवळपास ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना घडली.


शेतकरी प्रताप जोगदंड यांच्या शेतातील जळालेल्या उसाचा तहसिलदार माधवराव बोथीकर यांनी तात्काळ पंचणामा करुन त्यांना झालेल्या नुकसानी संदर्भात आर्थिक मदत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या