🌟धनतेरसला काही परिवारांमध्ये लक्ष्मीपूजनही केले जाते, त्यानिमित्त विशेष माहिती🌟
(१०/११/२०२३-धनत्रयोदशी,धन्वंतरी पूजन,धन्वंतरी जयंती निमित्त विशेष माहिती)
धनतेरस हा दिवाळीचा दिवस भगवान धन्वंतरी या देवतेचा वाढदिवस म्हणून हजारो वर्षांपासून साजरा केला जातो. भगवान धन्वंतरींना आरोग्याची देवता संबोधले जाते. त्यामुळे भारतीय चिकित्सक हा दिवस अत्यंत भक्तिभावाने धन्वंतरींचे पूजन करून साजरा करतात. धनतेरसला काही परिवारांमध्ये लक्ष्मीपूजनही केले जाते, त्यानिमित्त विशेष माहिती
आरोग्य देवतेचा वाढदिवस लक्ष्मीपूजन ‘आरोग्य हीच खरी लक्ष्मी आहे’, हेच सुचवून जातो... आश्विन कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी दीपावलीच्या दोन दिवस अगोदर समुद्रमंथनातून दुधाच्या सागरातून एक रत्न अवतरले. भगवान धन्वंतरी देव असुरांनी मंदार पर्वत वादुकी सर्पाने केलेल्या मंथनातून अमृताचा कलश घेऊन अवतरले. धन्वंतरीच्या चार हातांपेकी एका हातात शंख, एका हातात चक्र एका हातात जळू एका हातात अमृताचा कलश पाहताच असुरांनी अमृताचा कलश पळवला असे म्हटले जाते.....
भगवान धन्वंतरींच्या चार हातांतील आयुधे मनुष्यामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व व्याधींवरील निश्चित नेमके उपाय मानले जातात... अमृताच्या कलशाचा मोह असुरांना होता म्हणून त्यांनी तो हिसकावला खरा, परंतु या घटनेनंतर मोहिनी अवतार प्रकटला मोहिनीने हा अमृत कलश असुरांकडून परत मिळवला, असा उल्लेख आहे. धन्वंतरींच्या हातातील शंख, चक्र महत्त्वाचे प्रतीक मानतात.....
आपल्या चार हातांत अवघ्या भूतलावरील प्राण्यांचे आरोग्य भगवान धन्वंतरींनी सामावले असून, पृथ्वीतलावरील प्रथम १४ रत्नांपैकी एक, पहिले चिकित्सक मनुष्याच्या शरीर मनाला त्रास देणाऱ्या घटकांचा नाश करण्यासाठी अवतरले, प्रकट झाले तो दिवस म्हणजे धनतेरस.....
भगवान धन्वंतरींनी शस्त्रक्रियेचे ज्ञान भगवान सुश्रुताचार्यांना दिले... सुश्रुताचार्य हे शस्त्रक्रियेचे जनक मानले जातात.आयुर्वेदाचे धन्वंतरींकडून मिळालेले ज्ञान चरकाचार्यांनी वृद्धिंगत केले. भूतलावरील सर्व पंचभौतिकांच्या प्रयोगाने चरकसंहिता चिकित्सा ग्रंथ निर्माण झाला. चरकाचार्यांच्या या ग्रंथात कोणत्याही युगात निर्माण झालेल्या, होणाऱ्या व्याधींचे वर्णन दिसून येते सुश्रुताचार्य भूल देता अनेक शस्त्रक्रिया यशस्वी करीत असत असा उल्लेख आढळतो.....
धन्वंतरींना विष्णूचा अवतार मानले जाते. धन्वंतरींच्या वडिलांचे नाव होते दिर्धात्मा, ज्यांचा आणखी एक पुत्र असल्याचा उल्लेख आढळतो... धन्वंतरींना केतुमान नावाचा पुत्र होता भीमरथ हा धन्वंतरीचा नातू, केतुमानचा पुत्र. भीमरथपुत्र दिवोदास दिवोदासचा पुत्र द्युमन, ज्यास प्रतर दान नावानेही ओळखले जात असे. धन्वंतरींच्या परिवारात आयुर्वेद एवढा रुजलाच नाही, तर आयुर्वेद भगवान धन्वंतरींकडून गुरू-शिष्य परंपरेने प्रसारित झाला, ही आयुर्वेदाची परंपरा आजही भारतात दिसून येते.....
धन्वंतरींचे मंदिर गुजरातमध्ये एकमेव असल्याचे सांगितले जाते... परंतु, दक्षिणेत धन्वंतरींच्या मूर्ती आढळतात त्यांची पूजाही नियमित केली जाते. तामिळनाडूमध्ये श्री रंगनाथ स्वामी मंदिरात धन्वंतरींचे देऊळ असून, तेथे नित्य पूजा होत असते.या धन्वंतरींच्या मंदिरासमोर १२व्या शतकातील कोरलेले दगड असून, त्यावर त्या काळातील प्रसिद्ध वैद्य गरुड वाहन भत्तर ह्यांची माहिती आढळते. या मंदिरात आजही धन्वंतरीचा प्रसाद म्हणून विविध वनस्पतींचे उकळलेले मिश्रण तीर्थ म्हणून भक्तांना दिले जाते.....
उत्तरेत मात्र केवळ भगवान धन्वंतरीचे मंदिर आढळत नाही त्याचे कारणसुद्धा स्पष्टपणे सांगता येत नाही... वाराणसीतील संस्कृत विद्यालयात धन्वंतरीची मूर्ती तेथील संग्रहालयात आढळते.दिल्लीत शासकीय आयुर्वेद महाविद्यालयामध्येदेखील आढळून येते. परंतु, केरळमध्ये मंदिर स्वरूपात ही मूर्ती दिसून येते. त्यावरून भक्तीचे प्रमाण पुरण काळापासून आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही....
गुजरातमध्ये भगवान धन्वंतरीची समाधी असल्याची कथा असून, त्यांचा शास्त्रीय उल्लेख इतिहास पुराणात आढळत नाही... (ज्या व्यक्तींना याबद्दल निश्चित माहिती असेल त्यांनी पुराव्यासह त्या जरूर लोकांसमोर मांडाव्यात.....)
केरळमध्ये अनेक वैद्य घराणी सामान्य घरांमध्येही नियमितपणे धन्वंतरी पूजन होत असते... गुरुवायूर या प्रसिद्ध स्थानापासून २० किलोमीटरवर ‘नेलीवया’ या गावात गुरुवायूर त्रिचूरच्या अगदी मध्यावर भगवान धन्वंतरीचे मंदिर आहे. गुरुवायूर मंदिर अतिशय प्राचीन असल्याचे इतिहास सांगतो.....
केरळमधील अनेक वैद्य या मंदिरात व्यवसाय सुरू करण्याअगोदर पूजनासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी येतात. केरळमध्ये रेल्वेस्थानकापासून १० कि.मी. अंतरावर कन्नूर येथे धन्वंतरीचे प्रसिद्ध मंदिर आहे... या ठिकाणी धन्वंतरी पूजा करण्यासाठी विश्वातील भाविक येतात. या मंदिरात लिलीच्या फुलांनी कायम बहरलेले तळे आहे. कालिकतमध्ये धन्वंतरी क्षेत्र असून, या ठिकाणी विविध स्थानांतून अनेक रुग्ण आपल्या शरीराची त्यापासून मुक्तता मिळविण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी येतात.....
भगवान धन्वंतरी आज केवळ महाराष्ट्र भारतापुरते मर्यादित नसून, जगभरातील अनेक देशांमध्ये आपल्या गुणांनी प्रसिद्ध झाले आहे... त्यांच्या विविध रूपांचे, चित्रांचे अमेरिका, जर्मनी, रशिया, ब्रिटनमध्ये पूजन होताना दिसते. आजही सर्वत्र सर्व वैद्य, चिकित्सक चिकित्सा बल, शक्ती वाढविण्यासाठी धन्वंतरीकडे प्रार्थना करतात. परंतु, सामान्य व्यक्ती आरोग्य रक्षणासाठी, दोषमुक्तीसाठी इच्छा प्रदर्शित करतील. आज विविध विषाणूंच्या वाढीच्या काळात, मानवासाठी धोकादायक व्याधींच्या प्रसाराच्या काळात भगवान धन्वंतरींचे आशीर्वाद सर्वांसाठी हवेत तशी प्रार्थना या विश्वातील प्रथम चिकित्सकाकडे करूया.....*
*श्रीधन्वंतरी ये नम:...
कासास्य कसी तत पुरो ,राष्ट्रो दीर्घतम: पिता धन्वंतरी दीर्घतमसा, आयुर्वेद प्रवर्तक: यज्ञ भुग वसुदेवा : स्मृता: मात्र आर्तिनाशक...!
इति शम...
✍️ मोहन चौकेकर
धनत्रयोदशी, धन्वंतरी पूजन, धन्वंतरी जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पत्रकार मोहन चौकेकर मराठी पत्रकार परिषद बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख* 💐💐💐💐
0 टिप्पण्या