🌟महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज झालेले संक्षिप्त निर्णय....!


🌟बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार🌟  

दिनांक ८ नोव्हेंबर २०२३ 

* धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तीप्रदत्त समिती. 

( इतर मागास बहुजन कल्याण) 

* राज्यातील निर्यातीला वेग देणार. राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. ४२५० कोटी तरतुदीस मान्यता

( उद्योग विभाग) 

* मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा. २२०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार.

( जलसंपदा विभाग) 

 * अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरणार 

( वैद्यकीय शिक्षण)

* मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा.

 ( वस्त्रोद्योग विभाग)   

* गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करणार. आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची २८२ पदे भरणार 

( इतर मागास बहुजन कल्याण )

* विदर्भात ५ ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार. संत्रा उत्पादकाना मोठा फायदा

( सहकार विभाग) 

* मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारणार 

( पर्यटन विभाग) 

* बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार 

( गृह विभाग)

* महाराष्ट्र बोव्हाईन ब्रिडिंग रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापणार. रेतन केंद्रे रोगमुक्त करणार

( पशुसंवर्धन) 

* नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले. एअर इंडियाचे सर्व अनर्जित उत्पन्न व  दंड माफ 

( सार्वजनिक बांधकाम विभाग)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या