🌟 परभणी जिल्ह्यात १७ नोव्हेंबर रोजी संविधान बचाव यात्रेचे होणार आगमन🌟
परभणी : भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तथा इंदु मिलचे प्रणेते व रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष मा.काकासाहेब खांबाळकर यांच्या नेतृत्वाखालील संविधान बचाव यात्रा दि.२४ ऑक्टोंबर २०२३ रोजी नागपूर दिक्षाभूमी ते दादर चैत्यभूमी मुंबई कडे निघाली असून ही यात्रा आपल्या परभणी जिल्ह्यात उद्या शुक्रवार दि.१७ नोव्हेंबर २०२३ रोजी येणार आहे आणि गंगाखेड तालुका महातपुरी येथे सभेचे आयोजन व परभणी शहरामध्ये शनिवार दि.१८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११-०० वाजता सावली रेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषद व दुपारी ०१-०० वाजता सखा गार्डन जिंतूर रोड परभणी येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या संविधान बचाव यात्रेच्या स्वागतात आयोजित कार्यक्रमात रिपब्लिकन सेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त संविधान प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन परभणी जिल्हा रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रमुख तथा निमंत्रक राजकुमार सुर्यवंशी यांनी केले आहे.....
0 टिप्पण्या