🌟पुर्णेतील बुद्ध विहारात वर्षावास समारोप संघदान धम्म देशना व सत्कार समारंभ संपन्न....!


🌟महामानव भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणण्याचा संकल्प करा - सतीश कांबळे


 
पुर्णा (दि.०१ नोव्हेंबर) - पुर्णेतील बुद्ध विहारात अखिल भारतीय भिक्कु संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो पूज्य भदंत पाय्यावांश यांच्या प्रमुख मार्गदर्शनखाली दि.३१ ऑक्टोबर २०२३ रोजी वर्षावास समारोप संघदान धम्म देशना व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पूज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांचा ४२ वा वर्षावास पूज्यनीय भिक्कु संघाची धम्म देशना व सत्कार समारंभ अत्यंत उत्साहाने संपन्न झाला. 


या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो राष्ट्रीय कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्कु संघ हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा.सतीश कांबळे राज्य सरचिटणीस का स्ट ट्रा इब संघटना महाराष्ट्र राज्य मा.विशाल चीतलांगे आडत व्यापारी महासंघ युवा उद्दोजक संदीप ढगे  मा.आनंद अजमेरा अध्यक्ष अभिनव विद्याविहार प्रशाला मा.डॉ.गुलाबराव इंगोले  आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी  संबोधित करताना राज्य        कास्ट  ट्रा ईब  कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सतीश कांबळे यांनी महामानव तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मानव मुक्तीचे विचार खऱ्या अर्थाने आचरणात आणण्याची गरज आहे.त्या मधूनच आपला उत्कर्ष होऊ शकतो.अशा प्रकारचे प्रतिपादन त्यांनी केले.


प्रास्ताविक भदंत पाय्यावांश यांनी केले. पूर्णा येथील बुद्धविहार हे धम्माचे आदर्श संस्कार केंद्र आहे.माझी जडण घडण येथूनच झाली.जालना येथील भदंत शिवली थेरो बीड येथील धम्मशिल यांनी आपल्या धम्मदेशने मध्ये शिल सदाचार दान पारमिता चे महत्व विशद केले.अध्यक्षीय समारोपात भदंत डॉ.उपगुप्त महा थेरो यांनी बुद्ध धम्म तत्वज्ञान जगाला मानवतेची समतेची बंधुभावाची शिकवण देते.जगाला सद्य परिस्थिती मध्ये या विचाराची नितांत आवश्यकता आहे.पूजनीय भिक्कु संघाचा त्यांनी परिचय करून दिला.त्याच प्रमाणे अंशकालीन श्रा मनेर शिबिर आयोजन पाठीमागील भूमिका विशद केली.महामानव भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती मंडळ २०२३ यांनी जयंती मंडळाच्या खर्चातून बचत करून शव रथ खरेदी केला या कामामध्ये जयंती मंडळाचे अध्यक्ष भदंत पाय्या वंश व पदाधिकारी यांचे  यांचे कौतुक केले.उपस्थित महिला मंडळाच्या हस्ते भिक्कु संघाचे फळ दान चिवरदान देऊन स्वागत केले.

प्रमुख अतिथी यांचे स्वागत शाल पुष्पहार स्मरणिका व स्मुर्ती चिन्ह देऊन करण्यात आले.युवा उद्दोजक संदीप ढगे यांच्या कडून उपस्थितांना भोजन दान व्यापारी महासंघाचे विशाल चीतलांगे यांच्या कडून खीर दान करण्यात आले.प्रमुख उपस्थिती मध्ये जेस्ट आंबेडकरी विचार वंत प्रकाश कांबळे   नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उत्तम भय्या खंदारे  जेस्ट नगर सेवक अनिल खर्गखराटे नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड धम्म दिप जोंधळे दादाराव पंडित धम्मा जोंधळे मुकुंद भोळे यादवराव भवरे देवराव खंदारे अशोक ध बाले भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष श्यामराव जोगदंड कामगार नेते अशोक कांबळे दिलीप माने  प्रा.अशोक कांबळे उद्दोजक गौतम भोळे साहेबराव सोनवणे जेस्ट धम्म उपासकअमृतराव मोरे मुगाजी  खंदारे टी.झेड.कांबळे वा.रा. काळे पत्रकार विजय   बगा टे दिलीप गायकवाड पी.जी.रणवीर शिवाजी थोरात बाबाराव वाघमारे मुंजाजी गायकवाड सिद्धार्थ भालेराव मुकुंद पाटील बौद्धाचा र्य उमेश बारहाटे अतुल गवळी किशोर ढाकर गे त्रांबक कांबळे आदींची उपस्थिती होती.स्वागत गीत शाहीर विजय सातोरे यांनी सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्ासाठी राम भालेराव राजू जोंधळे राहुल धबाले सूरज जोंधळे प्रकाश जगताप व भारतीय बौद्ध महासभा धम्म सेवेत कार्यरत असलेली   महिला मंडळे यांनी परिश्रम घेतले.आशीर्वाद गाथे ने समारोप झाला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या