🌟नगर परिषद सदस्य/नगराध्यक्ष ते शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष पदापर्यंतचा मो.हाजी कुरेशी यांचा यशस्वी प्रवास🌟
शिवसेना (शिंदे) अल्पसंख्यांकचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मो.हाजी करेशी यांनी प्रथमतः आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पुर्णा नगर परिषद सदस्य पदापासून केली त्यानंतर पुर्णा नगर परिषदेत उपनगराध्यक्ष/नगराध्यक्ष आदी पदांवर यशस्वी वाटचाल करीत शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष पदापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास निश्चितच प्रशंसनीय म्हणावा लागेल अल्पसंख्यांक मुस्लिम कुरेशी समाजात जन्मलेल्या हाजी कुरेशी या दृढनिश्चयी नेत्याच्या यशस्वी राजकीय प्रवासाची यशस्वी गाथा आज संपूर्ण राज्यातील अल्पसंख्याक मुस्लिम तरुणांना निश्चितच प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या नावाचा शिक्का आज राज्याच्या मंत्रालयात खनखनत आहे.
शिवसेना अल्पसंख्याकचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय सईद खान यांनी मो.हाजी कुरेशी यांच्या यशस्वी सामाजिक/राजकीय कर्तृत्व क्षमतेचा सखोल अभ्यास करून त्यांच्याकडे शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष पदाची जवाबदारी सोपवली त्यांनी देखील शिवसेना अल्पसंख्याक उपाध्यक्ष पदाची जवाबदारी यशस्वीपणे पार पाडीत अल्पसंख्यांक समाजातील असंख्य तरुणांना शिवसेनेच्या प्रवाहात ओढण्याचे काम केले परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदार संघातील पुर्णा पालम गंगाखेड या तिनही तालुक्यांसह संपूर्ण परभणी जिल्ह्यात शिवसेना (शिंदे) पक्षाचे वर्चस्व निर्माण करणाऱ्यांमध्ये आज शिवसेना अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सईद खान व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मो.हाजी कुरेशी यांचे नाव आघाडीवर आहे.
परभणी जिल्ह्यातील राजकीय/सामाजिक क्षेत्रात यशस्वी राजकारणी यशस्वी समाजसेवक तथा यशस्वी व्यापार उद्योजक म्हणून मो.हाजी कुरेशी यांनी आपले वर्चस्व निर्माण केले आहे मुस्लिम समाजच नव्हे तर सर्वधर्मीय सर्व समाजातील तसेच बहुजन समाजातील लोकांमध्ये त्यांनी आपली एक वेगळे वर्चस्व निर्माण केले आहे उद्या रविवार दि.१९ नोव्हेंबर २०२३ रोजी शिवसेना नेते तथा शिवसेना (शिंदे) अल्पसंख्यांकचे प्रदेश उपाध्यक्ष मो.हाजी कुरेशी यांचा वाढदिवस असून त्यांना जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स परिवाराकडून तसेच शहिद उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्र कडून वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा...
0 टिप्पण्या