🌟पुर्णा महसुल प्रशासनाचे घोर पाप : कमी पर्जन्यमान असून देखील कावलगाव मंडळ वगळले दुष्काळ यादीतून...!


🌟कावलगाव मंडळातील शेतकऱ्यांनी दिले तहसिलदार माधवराव बोथीकर यांना निवेदन🌟 

पुर्णा (दि.१३ नोव्हेंबर) - पुर्णा तालुक्यातील कावलगाव मंडळात अत्यंत कमी पर्जन्यमान असून देखील महसूल प्रशासनातील अकार्यक्षम अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक कावलगाव मंडळ दुष्काळ यादीतून वगळण्याचे घोर पाप करीत कावलगाव मंडळातील अन्नदाता शेतकऱ्यांना पिक विम्यासह शासनाच्या विविध अनुदानापासून देखील वंचित ठेवण्याचा अघोरी प्रयत्न चालवल्या मुळे आज सोमवार दि.१३ नोव्हेंबर २०२३ रोजी कावलगाव मंडळात येणाऱ्या गावांतील शेतकऱ्यांनी पुर्णेचे तहसीलदार माधवराव बोथीकर यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे कावलगाव  मंडळाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी केली.

या संदर्भात शेतकऱ्यांनी तहसिलदार बोथीकर यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की कावलगाव महसूल मंडळ असून या खरीप हंगामामध्ये सततच्या पावसाच्या खंडामुळे या मंडळात सोयाबीन,कापूस मुग,उडीद,तुर,ज्वारी,आदी पिकांच्या उत्पन्नात तब्बल ७० %ते ८० % उत्पन्न घट झाली असून अत्यंत कमी. पर्जन्यमानामुळे कोरड्या दुष्काळाची परिस्थिती झाली आहे जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त यादी मध्ये तालुक्यातील पाच ही मंडळांचा समावेश असला तरी कावलगाव मंडळाचे नाव नाही कावलगाव मंडळात दुष्काळ पडला हे सत्य असले तरी दुष्काळग्रस्त यादीत कावलगाव मंडळाचे नाव नसल्याने तात्काळ दुष्काळ यादीत समावेश करावा असेही निवेदनात म्हटले आहे 

पुर्णेचे तहसीलदार यांना शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात असेही असाही इशारा देण्यात आला आहे की कावलगाव मंडळाचा दुष्काळ ग्रस्त यादी मध्ये समवेश न झाल्यास तहसील कार्यालयावर दि.०६ डिसेंबर २०२३ रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल त्यामुळे तहसिलदार साहेबांनी तात्काळ कावलगाव मंडळाचा समावेश करुन शासनास सत्य परिस्थितीची जाणीव करून द्यावी असेही म्हटले असून या निवेदनावर असंख्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत..... 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या