🌟श्री सत्यसाई संघटनेतर्फे दि.१८ नोव्हेंबर रोजी साई सत्संग हाॅल,सर्वोदय वार्ड येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन🌟
गडचिरोली (दि.११ नोव्हेंबर) - गडचिरोली येथे भगवान श्री सत्यसाई यांच्या जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होऊ घातला आहे. त्याप्रित्यर्थ स्थानिक श्री सत्यसाई संघटनेतर्फे दि.१८ नोव्हेंबर २०२३ रोज शनिवारला साई सत्संग हाॅल, सर्वोदय वार्ड गडचिरोली येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. तरी सामाजिक दायित्व पार पाडण्याचे दृष्टीने या शिबिरात जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती श्री कृष्णकुमार निकोडे गुरूजी यांनी आमच्या कार्यालयास दिली आहे......
0 टिप्पण्या