🌟जंग-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या…...!


🌟लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची जोमाने तयारी सुरू, मातोश्री पार पडली महत्त्वाची बैठक🌟

* मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा 15 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र दौरा

* कार्तिकी एकादशीची महापूजा मनोज जरांगे यांच्या हस्ते करावी, पंढरपुरात मराठा समाजाची मागणी

* विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनरांगेत यंदा प्रथमच भाविकांच्या आरामाची व्यवस्था

* सांगली जिल्ह्यात कुणबी नोंदी शोध मोहीम गतिमान : 2211 कुणबी अभिलेख सापडल्याचा जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांचा दावा*

* अजित पवार गटाकडून 20 हजार बोगस कागदपत्रे, शरद पवार गटाचा निवडणूक आयोगात दावा

* एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, कर्मचारी-अधिकाऱ्यांना 6000 रुपयांचा बोनस जाहीर

* कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात ढगाळ वातावरणामुळे  किरणोत्सव  झाला नाही

* 40  प्रवासी घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स कोकरुड-नेर्ले पूलावरुन वारणा नदीत कोसळली

* दिवाळीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात दररोज धावणार अधिकच्या बसफेऱ्या,एसटी विभागाने केले नियोजन

* कोल्हापूर जिल्ह्यातही कुणबी नोंदी सापडल्या; कागल व करवीर या दोन तालुक्यात सर्वाधिक दाखले मिळाले, मराठवाड्यापेक्षा जास्त नोंदी मिळण्याचा अंदाज!

* ठिपक्यांची रांगोळी ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; थाटात पार पडलं स्वानंदी आणि आशिषचं केळवण

* सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर : सोन्याच्या दरात झाली घसरण; सोने 0.21 टक्क्यांनी झाले स्वस्त

* आता उपग्रहाच्या माध्यमातून प्रत्येक गावात हायस्पीड इंटरनेट पोहोचणार, खासगी कंपन्याही यात सहभागी होणार

* अ‍ॅमेझॉनमध्ये पुन्हा एकदा नोकर कपात; दिग्गज ई-कॉमर्स कंपनी आता संगीत विभागातील अनेकांना घरी बसवणार

* लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची जोमाने तयारी सुरू, मातोश्री पार पडली महत्त्वाची बैठक

* दिवाळीत वाहतूक वाढणार; अपघात रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करा, थेट कारवाई करण्याचे आदेश

* मुंबई शहरासह उपनगरातील काही भागांमधली पातळी मोठ्या प्रमाणात खालावली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर! राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी उचलली कठोर पावलं

* राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरील पुढील सुनावणी 20 नोव्हेंबरला होणार; आजची सुनावणी संपली असून याप्रकरणी तब्बल दीड तास सुनावणी झाली

* भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात धमकीच्या प्रकरणी जयेश पुजा आणि त्याच्या साथीदारांविरोधात दोन गुन्हे दाखल

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या