🌟नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी प्रशासक डॉ.परविंदरसिंग पसरीच्या यांच्या काळातील निर्णय रद्द करा....!


🌟प्रशासक विजय सतबीरसिंग यांच्याकडे स.गुरमीतसिंग महाजन व स.गुरप्रितसिंग सोखी यांची मागणी🌟 


नांदेड /प्रतिनिधी - सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे तत्कालीन प्रशासक डॉ. परर्विंदरसिंग पसरिचा यांच्या कार्यकाळामध्ये घेण्यात आलेले निर्णय रद्द ठरवून त्याची उच्चस्तरिय चौकशी करावी अशी मागणी गुरमीतसिंग महाजन व भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे सचिव स. गुरप्रितसिंग सोखी यांनी विद्यमान प्रशासक डॉ.विजय सतबीरसिंग यांच्याकडे केली आहे. 

(स.गुरमीतसिंग महाजन)

 माजी पोलीस महासंचालक डॉक्टर परविंदरसिंग पसरिचा यांच्याकडे 2021 -22 मध्ये गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक पदाचा पदभार होता. या कालावधीत अनेक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात दाखल याचिका क्रमांक - 110553 /2022 वर निर्णय देत न्यायालयाने आर्थिक व धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत पसरिचा यांना मनाई केली होती. तरीही  त्यांनी पदाचा गैरवापर करीत अनेक नियमबाह्य कामांना मंजुरी देऊन गुरुद्वारा बोर्डाचे नुकसान केले आहे. 

   ( स.गुरप्रितसिंग सोखी )

  यामध्ये यात्री निवासची हाउसकीपिंगचे टेंडर बीव्हीजी कंपनी पुणे व ओमसाई कंपनी नांदेड यांना 22 लाख रुपये प्रति महिना बहाल केले जे की गुरुद्वारा बोर्ड केवळ 6 लाख रुपये प्रतिमाह करीत होते, त्यांचे स्विय सहाय्यक जसबीरसिंग धाम यांचेशी संगनमत करून गोविंदबाग फौंटन टेंडर गुरुद्वारा गेट नंबर 2 च्या पार्किंगसाठी करोडो रुपयाने दिले, अबचलनगर कॉलनी येथे नियमबाह्यरित्या दुकानाचे टेंडर देण्यात आले, गुरुद्वारा तक्त साहिबच्या आतील परिक्रमाचे नक्षीकाम इंग्लंड निवासी महेंद्रसिंग यांना दिले, त्याचप्रमाणे मागील वर्षी गुरुतागद्यी कार्यक्रमादरम्यान ' उठ चल कलम उठा ' उपक्रमा वर्ष 1 कोटी रुपयांच निधी   गाखलजी श्रद्धालू यांनी दिले होते अशाप्रकारे अनेकांनी दिलेल्या देणगी त अनियमितता झाल्याचा आरोप करित पसरिचा यांच्या काळातील निर्णय रद्द करून उच्चस्तरिय चोकशी करण्याची मागणी प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंग यांना दिलेल्या निवेदनात गुरमीतसिंग महाजन व गुरप्रितसिंघ सोखी केला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या