🌟अत्यंत धम्ममय वातावरणात मान्यवरांच्या व हजारोंच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न🌟
विश्वाला करुणा आणि मैत्रीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचे विचार प्रत्येकाने अनुसरावेत व परमपूज्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकराचे बौद्धमय भारताचे स्वप्न साकार व्हावे या विचाराने प्रेरित होवून आश्रय सेवाभावी संस्था व गगन मलिक फाउंडेशनच्यावतीने थायलंड येथील सहा फूट उंचीच्या पन्नास बुद्धरूप मूर्तीचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचा अध्यक्ष झाल्यापासून मी महाराष्ट्रात विहार तेथे बुद्धरूप मूर्ती हे अभियान आम्ही राबवत आहोत. काल परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर बुद्धरूप मूर्तीचा वितरणाचा सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी विश्वशांतीसाठी थायलंड व भारतातील भदंतांनी धम्म देशना दिली.
थायलंड येथील भिक्खू संघ, पूर्णायेथील आदरणीय डॉ.भदंत उपगुप्त यांच्या सह कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे जेष्ठ नेते आदरणीय विजय वडेट्टीवार साहेब, प्रसिद्ध सिने अभिनेते गगन मलिकजी, कॅप्टन नटकीट उपस्थित होते. या सोहळयाला प्रामुख्याने लोकनेते विजय वाकोडे साहेब, डॉ.सिद्धार्थ भलेराव, कीर्तीकुमार बुरांडे प्रेक्षा विजय भांबळे, मुकेशराव बोराडे, रामराव उबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याच बरोबर धम्मपदयात्रा समिती कोर कमिटीचे सन्मानीय सदस्य, काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे पदाधिकारी, विविध ठिकाणच्या 50 बौद्ध विहार समितीचे पदाधिकारी, परिसरातील बौद्ध अनुयायी हजारोच्या संख्येने व अत्यंत उत्साहाने उपस्थित होते. या हा सोहळा अविस्मरणीय आणि यशस्वी केल्याबद्धल आयोजक व संयोजक म्हणून मी सर्वांचे मना पासून आभार मानतो असे सिध्दार्थ हत्तीहंबीरे म्हणाले....
.
नमो बुद्धाय..! सप्रेम जयभीम !!
0 टिप्पण्या