🌟पुर्णा तालुक्यातील कंठेश्वर येथे मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी : साखळी उपोषनही सुरू....!


🌟क्रांतीकारी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज व ग्रामस्थांच्या वतीने कॅण्डल मोर्चा संपन्न🌟


 
पुर्णा (दि.०२ नोव्हेंबर) - पुर्णा तालुक्यातील कंठेश्वर येथील सकल मराठा समाजासह ग्रामस्थांच्या वतीने क्रांतीकारी मराठा योध्दा मनोज जरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ व मराठा आरक्षणासाठी काल बुधवार दि.०२ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०७-०० ते ०८-३० वाजेच्या दरम्यान भव्य कॅण्डल मोर्चा काढण्यात आला होता यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे.... मनोज जरांगे पाटील आगे बढों हम तुम्हारे साथ हैं....तुमच आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय...आदी गगनभेदी घोषणांनी संपूर्ण गाव परिसर दणाणला होता या भव्य कॅण्डल मोर्चात गावातील सकल मराठा समाज बांधवांसह अबालवृद्ध माता-भगिनींसह युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.


दरम्यान कंठेश्वर गावात आज गुरुवार दि.०२ नोव्हेंबर पासून सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे तसेच जोपर्यंत मराठा आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत कंठेश्वर गावात राजकीय नेत्यांना गावबंदी व सर्व निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्धार करून सामुहिक शपथ देखील सकल मराठा समाज व ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आली.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या