🌟महिला, दिव्यांग व नव मतदारांनी मतदार यादीमध्ये दि. 18 नोव्हेंबर व दि.19 नोव्हेंबर या कालवधीत विशेष शिबीराचे आयोजन🌟
परभणी (दि.20 नोव्हेंबर) : भारत निवडणूक आयोगाने दि.01 जानेवारी, 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार नव मतदारांनी, महिलांनी व दिव्यांगांनी दि. 27 ऑक्टोबर, 2023 ते दि. 9 डिसेंबर, 2023 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर नाव नोंदणी करून घेण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच महिला, दिव्यांग व नव मतदारांनी मतदार यादीमध्ये दि. 18 नोव्हेंबर, 2023 व दि. 19 नोव्हेंबर, 2023 या कालवधीत विशेष शिबीराचे आयोजन करुन नव मतदारांचे नोंदणी करण्याचे निर्देश दिलेले होते.
परभणी तालुक्यात दि. 23 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता डॉ. झाकीर हुसेन उर्दू जुनियर कॉलेज, डी.एड. कॉलेज, महिला महाविद्यालय येथे तहसील कार्यालय व डॉ. झाकीर हुसेन उर्दू ज्यूनियर कॉलेज, डी.एड कॉलेज महिला महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने नव मतदार जनजागृती शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये नव मतदारांचे एकूण 85 नवीन नाव नोंदणी अर्ज प्राप्त झाले तसेच शिवाजी महाविद्यालय येथे दि 18 ऑगस्ट, 2023 रोजी तहसील कार्यालय व शिवाजी महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने नव मतदार जनजागृती शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या जनजागृती शिबिराच्या अनुषंगाने नव मतदारांचे ऑनलाईन एकूण 620 अर्ज व ऑफलाइन 111 अर्ज प्राप्त झाले आहेत.
महिला जनजागृती शिबिराचे अनुषंगाने दि. 18 नोव्हेंबर, 2023 रोजी पाडेला प्रायमरी स्कूल सुभेदार नगर येथे तहसील कार्यालय व संस्थाचालक खमिसा गुलाम मोहम्मद व मुख्याध्यापक खालेद सद तसेच सोशल वर्कर शेख इमरान व इतर सह शिक्षक यांचे संयुक्त विद्यमाने महिला जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये नव मतदारांचे ऑनलाईन व ऑफलाइन एकूण 200 अर्ज प्राप्त झाले आहेत.
सदर कार्यक्रमाचे अनुषंगाने मतदान जनजागृतीबाबत सर्व पात्र विद्यार्थ्यांनी व महिला व नव मतदारांनी सशक्त लोकशाही घडविण्यासाठी त्यांनी त्यांची नावे मतदार यादी मध्ये नोंदविणे आवश्यक आहे. महिला मतदारांनी आपले नाव मतदार यादी मध्ये नोंदवून मोठ्या प्रमाणावर मतदान करणेबाबत तसेच सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याबाबत मार्गदर्शन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांचे वतीने नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर यांनी तसेच संस्थाचालक पाडेला प्रायमरी स्कूल खमिसा गुलाम मोहम्मद यांनी केले.
दि. 27 ऑक्टोबर, 2023 ते दि. 9 डिसेंबर, 2023 या कालावधी नव मतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीमध्ये नोंदविण्यासाठी नमुना नंबर-6, नावात दुरुस्तीसाठी नमुना नंबर-8, मयत अथवा कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणी करण्यासाठी नमुना नंबर-7 अर्ज मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत अथवा वोटर हेल्पलाइन ॲपचे माध्यमातून भराव्यात. या शिबीरात नव मतदारांना/महिलांना सदरील फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्राची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये तहसील कार्यालय यांनी नियुक्ती केलेल्या स्वीप टीमचे शिवाजी कांबळे यांनी मतदार जनजागृती पर गीत सादर केले. मतदार जनजागृती कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मतदान नोंदणी अधिकारी दत्तू शेवाळे, मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर, अनिता वडवळकर, नायब तहसीलदार निवडणूक सुरेखा टाक, अवल कारकून निवडणूक व इतर निवडणूक टीम तहसील कार्यालय यांचे सहकार्य लाभले.....
****
0 टिप्पण्या