🌟पुर्णेत लिंगायत समाजाचा सकल मराठा समाजाच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठिंबा....!


🌟मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेल्या मराठा बांधवांची भेट घेऊन दिले जाहीर पाठिंब्याचे पत्र🌟

पुर्णा (दि.०२ नोव्हेंबर) - पुर्णेतील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर क्रांतिकारी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मराठा समाज बांधवांची आज गुरुवार दि.०२ नोव्हेंबर रोजी लिंगायत समाज बांधवांनी भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या मागणीला लेखी स्वरूपात जाहीर पाठिंबा दिला यावेळी पुर्णा शहरातील समस्त लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या